वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
पुढे वाचा
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आता पाण्याचा वापर वाढणार हे ओघानेच आले, मात्र दरवर्षी कुठे ना कुठे पाणीटंचाईच्या सावटात अनेकांना दिवस काढण्याची वेळ येतेच, हेदेखील एक ज्वलंत वास्तव. आपल्या राज्यात मुबलक पाऊस होऊनदेखील उन्हाळ्यात पाणीटंचाई का निर्माण होते, या प्रश्नाच्या उत्तरात ‘मुजोर नोकरशाही’ हे एक कारण अधोरेखित होते. परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीच्या कार्यक्रमात याच नोकरशहांवर बोलताना “आपल्या राज्यातील नोकरशहा, ते अन्य राज्यांच्या नोकरशहांपेक्षा चांगले आहेत, असा समज करून बसले आह
( Minister Nitesh Rane on pilot project of eco-friendly water taxi in Mumbai ) मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या.
स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
पायाभूत सुविधा क्षेत्रात १ रुपयांची गुंतवणूक केल्यास स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते. हेच पाहता राज्यातील विमानतळे, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा आणि परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणावेळी सांगितले. यंदाचा अर्थसंकल्प हा प्रामुख्याने राज्यातील पायाभूत सुविधा आणि त्याअनुषंगाने इतर विभागांना चालना देणारा आहे.
Chandrashekhar Bawankule नागपूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या सुधारित पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने येत्या ३१ मार्च पूर्वी मंजुरी द्यावी, अशी सूचना महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रलंबित असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर मार्फत पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेल्या आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे समाज माध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन मंगळवार, २८ जानेवारी रोजी महापालिकेकडून करण्यात आले आहे.
मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने ( Central Government ) जलमार्गांवरील पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या उद्देशाने, जलमार्गांच्या विकासासाठी तब्बल ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. माल वाहतुकीसाठी नवा पर्याय यामुळे उपलब्ध होणार आहे. तो तुलनेने स्वस्त तर आहेच, त्याशिवाय पर्यावरणस्नेही आहे असे म्हणता येते.
चीनशी संबंध म्हणजे एक शून्याचा पाढा आहे. भारत-चीन सीमेबाबत चीन घुसखोरी केलेल्या भागातून परत गेल्यानंतर भारत-चीन संबंध सुधारतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, चीन सतत भारतावरती मानसिक दबाव टाकत राहील. सीमा विवाद करार झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारताला आठवण करून दिली की, चीन भारताविरुद्ध जलयुद्ध सुरुच ठेवेल. त्याची आठवण म्हणून एक घोषणा करण्यात आली की, एक महाकाय धरण चीन ब्रह्मपुत्रेवर भारत-चीन सीमेवर बांधत आहे. चीन भारताकडे केवळ एक आर्थिक बाजारपेठ म्हणून बघतो, एक बरोबरीचा देश म्हणून नाही, त्याचेच हे आणखी
मुंबई : कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ठाणे : सिमेंट, कॉक्रीटच्या जंगलात विकासाचे इमले उभे राहत असले तरी पायाभूत सुविधासाठी निसर्गातील शाश्वत पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सौर उर्जा ( Solar Energy ) आणि पर्जन्य जल यासारख्या पर्यावरणपुरक बाबींकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ठाण्यात पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनात पर्यावरणपुरक सुविधा पुरवणाऱ्या स्टॉलवर हजारो नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना म्हणाले की, “भारतातील प्रमुख नदीखोर्यांचे प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीवर आधारित होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने जल आयोगाची स्थापना झाली.” त्यानिमित्ताने या लेखात भारताच्या जलसंधारणाचे विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या जलनीती आणि कर्तृत्वाचा मागोवा घेतला आहे. त्यानुसार वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते घटनेचेच नव्हे, तर भारताच्या जलसंधारणाचेही शिल्पकार आहेत
ठाणे : ( Thane ) मुंबई महानगर प्रदेश( एमएमआर) मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूकीला गती देण्याची ग्वाही केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. खासदार म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेत मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी निवेदन दिले.
नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या ( Water Transport ) संदर्भात संसदेत नियम ३७७ अन्वये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावामधील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ‘एमआयडीसी’ ( MIDC ) विभागाचे सीईओ आणि सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. यावेळी पाणी प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पी. वेलारासू यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार राजेश
ठाणे : ( Thane ) ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यामुळे स्टेमची पाणी उचल क्षमता वाढुन नागरिकांची जलचिंता दूर होणार आहे.
ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणार्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे बंधार्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणार्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. एकूण ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा ( Water supply ) बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख बंदरांच्या सचिवांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन जेनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे सहसचिव संदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले.
नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतात असलेल्या विहिरी आणि बोअरवेललादेखील मुबलक पाणी ( Water ) असल्याने जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान मागील वर्षी अचानक पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध झाला असला, तरीही विहिरींनी तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला
ठाणे : ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास’ (एमआयडीसी) महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, या काळात ‘ठाणे महापालिका’ क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा ( Water Supply ) पूर्ववत
मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा ( water supply ) पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
ठाणे : जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपने एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचा १०० टक्के प्रतिबद्धतेचा संकल्प केला असुन केरळच्या धर्तीवर 'वॉटर मेट्रो' ( Water Metro ) सुरू करून महाराष्ट्रातील किनारी शहरे आणि बेटे जलमार्गाद्वारे जोडण्यात येणार आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन सोमवारी ठाण्यात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजप प
तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
( Shehzad Poonawalla ) देशाच्या राजधानीत दिल्लीच्या विविध भागांमध्ये धुरके पसरण्यास प्रारंभ झाला असून हवेची गुणवत्ता वेगाने खालावण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे यमुना नदीतही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) विषारी कारभारामुळे दिल्लीकरांना वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे.
चीनमधील दक्षिण-उत्तर जल हस्तांतरण प्रकल्पाच्या मध्य मार्गाने कार्य सुरू केल्यापासून, बीजिंगला एकूण दहा अब्ज घनमीटर पाणी हस्तांतरित केले गेले आहे. यापैकी सात अब्ज घनमीटर थेट शहरी घरगुती पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आल्याने, हा प्रकल्प आता बीजिंगसाठी मुख्य जलस्रोत बनला आहे. बीजिंग जल प्राधिकरणानुसार, शहरातील १६ दशलक्षाहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा थेट फायदा होत आहे.
अमृत योजनेच्या कामात अनेक अडचणी आल्या. अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. टाक्यांच्या जागा निश्चित केल्या गेल्या नाहीत. ज्या जागा निश्चित केल्या होत्या. त्या जागा आपल्या ताब्यात नव्हत्या. पण आता समाधानकारक परिस्थिती दिसते आहे. लवकरच अमृत योजना कार्यान्वित होईल असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणी दौरा दरम्यान केले.
( Thane Zilla Parishad ) ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हयात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण काम हाती घेण्यात आले असून आरोग्य विभागाच्या वतीने ३ हजार २६१ पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून त्यानंतर ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
(Thane)ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडिसी) महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडिसीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुकवार दि.२० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
भारतीय नौदलाच्या ‘माल्पे’ आणि ‘मुल्की’ या दोन पाणबुडीविरोधी जहाजांचे कोची येथे जलावतरण करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये यंदा चांगल्या पावसामुळे ९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरीही काही निवडक ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. तसेच बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके गठीत करावेत. अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महापा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दि. १ जुलै ते ९ जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे पुढील ५३ दिवस पुरेल इतक्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही तलाव भरून वाहू लागतील. तसेच मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट ही टळेल. १ जुलैला सात तलावात एकूण ८५,६०५ दशलक्ष लीटर (५.९१टक्के) म्हणजे २१ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता.
मुसळधार पावसाने ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असुन आजपासुन तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.
कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्या आधी जशी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला. तीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्या बाबती एमआयडीसी चालूगिरी करीत आहे. अधिवेशन संपल्यावर आम्हालापण काही काम नाही. पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
मान्सून दाखल झाल्यानंतर ही पिण्याच्या पाण्याची अडचण मुंबईत कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्यात आली होती. पण जूनमध्ये पाऊस पडून ही अपेक्षित पाणीसाठा धरणात नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कशेळी (भिवंडी) आणि मुलुंडचा जकात नाका दरम्यान मुंबईत नवीन जलवाहतूक बोगदा बांधण्यासाठी अफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. गुरुवार, दि.२० जून रोजी या निविदा उघडण्यात आल्या.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी पार पडले. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याची कामे
दिल्लीतील सर्वसामान्य जनतेला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. याचा फायदा दिल्लीतील टँकर माफिया घेत आहेत. दुसरीकडे, दिल्ली सरकार झोपले आहे. आता दिल्लीतील पाणीबाणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने दिल्ली सरकारला दिल्लीतील पाणी टंचाईवर चांगलेच खडसावले.
राज्यातील धरणे आणि तलावांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांत आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहे. भविष्यकाळात ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्यामुळे राज्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवार, दि. ११ जून रोजी दिल्या.
मुंबई महानगरपालिकेकडून उद्या बुधवार, दि. २९ मे ते गुरुवार, ३० मे दरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांना बुधवार, दि. २९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
हन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रासिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रासिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, दिनांक २९ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात उद्या पाणीबाणी
वीज उप केंद्रातील बिघाडाचा फटका बसलेल्या पवई निम्नस्तर सेवा जलाशयाच्या कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करत या निम्नस्तर सेवा जलाशयाच्या आवारातील विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १६ मे रोजी कौतुक केले. महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थेवाईक संवादामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले.
अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित
सीमाशुल्क, राज्य पोलीस विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), इमिग्रेशन यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांकडून अधिकारी आणि सरकार मंत्रालयातील अधिकारी असल्याचा दावा केला करत नाविक, खलाशी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून फसव्या बहाण्याने पैसे मागण्याच्या काही घटना निदर्शनात आल्याने पत्तन, पोत आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्र सरकार आणि नौवहन संचानालय, मुंबई यांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. ज्याद्वारे अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्
सार्वजनिक स्वच्छता हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सखोल स्वच्छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्वाही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. स्वच्छता मोहीम
जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. २ मे रोजी रात्री १० पासून ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.