बारावीच्या गुणांवर आलेल्या विद्यार्थ्यांचीच एमबीबीएसमध्ये उत्तम कामगिरी
चेन्नई : बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर डॉक्टर व्हायचे असेल, तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात् नीट अनिवार्य असते. मात्र, एमबीबीएसमध्ये नीट परीक्षा देऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात की बारावीच्या गुणांवर प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात, हे जाणून घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या मते, बारावीच्या गुणांवर प्रवेश घेणारे विद्यार्थी नीटच्या माध्यमातून आलेल्यांपेक्षा जास्त चांगले यशस्वी डॉक्टर ठरतात, असा महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे...