जपानमध्ये गणपतीची आहेत 250 मंदिरे
देशभरात शुक्रवारपासून गणेशोत्सव थाटात साजरा केला जात आहे. सर्व देवतांमध्ये गणपती अशी देवता आहे की, घरी देवघरापासून घरातील प्रत्येक कोपर्यापर्यंत, मग ते अभ्यासाचे टेबल असो किंवा बैठकीची खोली, सर्वत्र त्या विनायकाची प्रतिमा दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ज्याची भारतात घरोघरी पूजा केली जाते, त्या गणपतीची देशातच नव्हे तर परदेशातही पूजा केली जाते. या यादीत पहिले नाव आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिप्रगत अशा जपानचे आहे. जपान या देशात भगवान श्रीगणेशाची सुमारे 250 मंदिरे आहेत. जपानमध्ये, लोक गणपतीचे ..