एक सरकार, दोन नेते आणि दोन तऱ्हा
महाराष्ट्रात सरकार एकच आहे. ते म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे. ‘आम्ही एकदिलाने कारभार करीत आहोत’, हे सांगताना या तिन्ही पक्षांचे नेते थकत नाहीत. पण परस्परांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा त्यांचा कार्यक्रम अधूनमधून सुरुच असतो. वास्तविक तीन पक्ष म्हटले म्हणजे तीन तऱ्हा आल्याच पण ते मान्य करायला हे पक्ष तयार नसतात. वेळ पडली तर पवारसाहेबांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवायला मात्र विसरत नाहीत...