मुंबई बॉम्ब स्फोटातील दहशदवादी याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स काढल्या ! मुंबई पोलिसांची कारवाई

08 Sep 2022 14:30:39
मुंबई : दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण केल्याचं वृत्त बुधवारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या एका टीमने तातडीने दक्षिण मुंबईतल्या बडा कब्रस्तानमधल्या मेमनच्या कबरीची पाहणी केली. आज पुन्हा एलटी मार्गच्या पोलीस पथकाने कब्रस्तानात जाऊन पाहणी केल्यानंतर कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. तर 'शब ए बारात'निमित्त लायटिंग लावली होती, असं तिथल्या ट्रस्टीचं म्हणणं होतं.
 
 

meman1 
 
 
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये (Bada Kabrastan South Mumbai) दफन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या वृत्ताने काल एकच खळबळ उडाली होती. अखेर आज मुंबई पोलिसांनी कारवाई करुन याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. आज पुन्हा थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील बडा कब्रस्तानमधील मेमनच्या कबरीची पाहणी करतील.
 
पोलिसांच्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी देखील तिथे थोड्याच वेळात जाणार आहे. तेथील सद्यस्थिती नेमकी काय आहे, याची पाहणी करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या पाहणी टीममध्ये वरिष्ठ अधिकारी असतील. अगदी काही वेळात ते बडा कब्रस्तानमध्ये पाहणीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
- याकूब 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी
- मुंबई बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचा मृत्यू
- स्फोटासाठी निधी गोळा केल्याचा याकूबवर आरोप
- याकूब मुख्य आरोपी टायगर मेमनचा मोठा भाऊ
- याकूब मेमन पेशानं चार्टर्ड अकाऊंट होता
- बॉम्बस्फोटात याकूबच्या कुटुंबातील 4 सदस्य सहभागी
- 2007 ला टाडा कोर्टानं सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा
- 30 जुलै 2015 ला याकूब मेमनला फाशी
Powered By Sangraha 9.0