धक्कादायक... पुणे जिल्ह्यात नकली पनीर बाजारात, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई , लाखोंचे पनीर जप्त !

06 Sep 2022 13:17:35
पुणे :  पुणे जिल्ह्यात पनीर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील कारवाई केलेल्या कारखान्यांमधून लाखो रुपयांचा नकली पनीर जप्त करण्यात आला आहे. (Pune Fake Paneer) अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे कारवाई करण्यात आली आहे. येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारण्यात आला. यामध्ये नकली पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला आहे.
 

paneer 
 
 
 
 
या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0