"पिढ्या घडवणे, पिढ्यांचा उत्कर्ष करणे हे शिक्षकाचे कार्य आहे"

05 Sep 2022 11:41:31
" विद्यार्थ्याच्या मनात वस्तुस्थिती बिंबवतो तो शिक्षक नसतो, तर खरा शिक्षक तो असतो जो त्यांना उद्याच्या आव्हानांसाठी सज्ज करतो. " शिक्षकांच्या उपयुक्ततेबद्दलचे हे मत भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आहे, ज्यांना आपण राजकारणी किंवा राष्ट्रपतीपेक्षा शिक्षक म्हणून अधिक ओळखतो आणि त्यांची जयंती 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. आज देशातील 15.09 लाख शाळांमधील 97 लाख शिक्षक 26.44 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचत आहेत. भारताचे भविष्य या विद्यार्थ्यांवरच अवलंबून आहे, त्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या आव्हानांसाठी त्यांना तयार करण्याची जबाबदारी या शिक्षकांची आहे. केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रशिक्षणाची नवी सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये केला आहे. एवढेच नव्हे तर 'परीक्षा पे चर्चा' सारख्या विविध कार्यक्रमांतून ते स्वत: विद्यार्थी आणि शिक्षकांशी सतत संवाद साधत आहेत. यावेळी शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी, त्यांच्या भाषणाचा सारांश म्हणून त्यांनी शिक्षकांना केलेल्या आवाहनाविषयी जाणून घ्या... तसेच अशा काही शिक्षकांबाबत माहिती, ज्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे...



guru2
 
 
 
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन. शिक्षक दिन म्हणून आपण तो साजरा करतो. जीवनात त्यांनी कितीही यशाची शिखरे गाठली तरी त्यांनी नेहमीच एक शिक्षक म्हणून जगण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ते नेहमी म्हणायचे, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यातला विद्यार्थी नेहमीच जागृत असतो. शिक्षकाला कधीच वयाचे बंधन नसते, शिक्षक कधी निवृत्त होऊच शकत नाही. विद्यार्थ्याचा शिक्षकाप्रती असलेला आदर, शिक्षकाची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील आपुलकीची भावना, हे एकमेव बंधन असते जे केवळ ज्ञानच देत नाही. तर जगण्याची कला शिकवते आणि स्वप्ने जपण्याची सवयही निर्माण करते. आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे- "दृष्टान्तो नैव दृष्टः त्रिभुवन जठरे, सद्गुरोः ज्ञान दातुः " म्हणजे संपूर्ण विश्वात गुरुची कोणतीही उपमा असू शकत नाही, त्याच्या समान कोणी नाही. जे कार्य शिक्षक करू शकतात ते दुसरे कोणी करू शकत नाही. आपले शिक्षक हे त्यांचे कार्य केवळ व्यवसाय मानत नाहीत, त्यांच्यासाठी शिकवणे ही मानवी भावना, पवित्र आणि नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्याकडे शिक्षक आणि मुलांमध्ये व्यावसायिक संबंध नसतो तर एक कौटुंबिक जिव्हाळा असतो. हे नाते, हा ऋणानुबंध आयुष्यभराचा असतो. म्हणूनच आज देश आपल्या तरुणांसाठी शिक्षणाशी संबंधित जे काही प्रयत्न करत आहे. त्याची भिस्त या शिक्षक बंधू-भगिनींवर अवलंबून आहे. मी शिक्षक दिनी देशातील सर्व शिक्षकांना नमन करतो आणि सर्व शिक्षकांकडून अपेक्षा करतो, आपले कार्य पिढया घडवणे, पिढ्यांचा उत्कर्ष करणे हे आहे, तेच देशाची प्रगती करतील. ते कार्य सर्व मिळून करूया.
 
 
 
 

shishya 
 
 
 
 
 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांचा सक्रिय सहभाग
 
कोणत्याही विद्यार्थ्याच्या संपूर्ण शिक्षणात, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे त्याचे शिक्षक, आपण म्हणतो कि गुरी न प्राप्यते यत्तन्नान्यत्रापि हि लभ्यते गुरुप्रसादात सर्व तु प्राप्नोत्येव न संशयः म्हणजेच जे गुरुंकडून मिळू शकत नाही, ते कुठेही मिळू शकत नाही. म्हणजेच उत्तम गुरु मिळाल्यावर दुर्मिळ असे काहीच नसते. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यापासून अंमलबजावणीपर्यंतच्या प्रत्येक सक्रिय
 
टण्यावर शिक्षक हा भाग आहे. शासनाचा निष्ठा 2.0 कार्यक्रम आणि 'निष्ठा 3.0' या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सर्वच शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही प्रयत्न केले तर तुमचे प्रयत्न देशाला खूप पुढे ती. या काळात आपण कोणत्याही भूमिकेवर विश्वास ठेवतो. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही अशा महान बदलांचे साक्षीदार आहोत, या बदलांमध्ये सक्रिय भूमिका निभावत आहोत. ही सुवर्णसंधी तुमच्या आयुष्यात आली आहे की, तुम्ही देशाचे भविष्य घडवाल. तुम्ही स्वतः भविष्याची रूपरेषा ठरवाल. मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या काळात, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विविध वैशिष्ट्ये जसजशी साकार होतील तसतसा आपला देश एका नव्या युगाचा साक्षीदार होईल. जसजसे आम्ही आमच्या तरुणांना आधुनिक आणि राष्ट्रीय शिक्षण प्रणालीशी जोडू तसतसे देश स्वातल्याचे अमृत संकल्प सिद्धीस नेईल.
 
विमान कितीही अत्याधुनिक असले, तरी ते उडवतो तो वैमानिकच
 
देशातील शिक्षक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या या प्रवासाचे मार्गदर्शक आहेत. नव्या पद्धतीने शिकणे असो, 'परख'च्या माध्यमातून नव्याने परीक्षा असो, विद्यार्थ्यांना या नव्या प्रवासात शिक्षकांनाच घेऊन जायचे आहे. कारण, विमान कितीही प्रगत असले तरी ते उडवणारा वैमानिकच असतो. त्यामुळे या सर्व शिक्षकांना सुद्धा खूप काही नवीन शिकायचे आहे. खूप जुने मागे टाकायचे आहे.
 
मुलांमध्ये कोणताही भेदभाव नसावा
 
खरे तर शिक्षकांच्या भूमिकेतून बघता मुलांमध्ये कोणताही भेदभाव नसावा. सर्व विद्यार्थ्यांमध्ये गुण आणि अवगुण असतात. विद्यार्थ्याचे चांगले गुण समजून घेणे हे शिक्षकाचे काम आहे. त्याला पैलू पाडणे. त्याचे आयुष्य, तो कसाही असला तरी त्याला प्रगतीची संधी देणे. शिक्षक फक्त हुशार मुलांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. घरी, पालक आपल्या सर्व मुलांकडे समान लक्ष देतात. त्याचप्रमाणे, शिक्षकासाठी कोणीही पुढे नाही, कोणी मागे नाही, कोणी वर नाही, कोणी खाली नाही. सर्व विद्यार्थी त्यांचेच असतात. प्रत्येकाची योग्यता जाणून घेतली पाहिजे. शिक्षक वर्गातील सर्व मुलांना समजेल असे बोलतात, सर्वाना आकलन होईल असे समजावण्याचा प्रयत्न करतात.
Powered By Sangraha 9.0