धक्कादायक ... मुस्लिम प्रथा न पाळल्यामुळे हिंदू पत्नीची निर्घृण हत्त्या !

27 Sep 2022 14:41:51
मुंबई : मुस्लिम प्रथा न पाळल्यामुळे आणि बुरखा घालण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने मुंबईत चेंबूर मधील टिळक नगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत आपल्या पत्नीची चाकू मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री दहाच्या आसपास ही घटना घडली असून पत्नी मुस्लिम रीती रिवाज पाळत नसल्यामुळे पतीने तिची हत्या केली आहे. तीन वर्षांपूर्वी आरोपी (Accused) मोहम्मद इकबाल शेख याच्याशी मृतक रूपाली हिने लग्न केले होते.. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. इक्बालने आपल्या पहिल्या पत्नीला मुले नसल्यामुळे घटस्फोट दिला होता.
 

hatya 
 
 
 
 
आपल्या हिंदू पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर भागात इकबाल महमूद शेख नावाच्या व्यक्तीने सोमवारी रात्री हिंदू पत्नी रुपालीची मुस्लिम प्रथा पाळत नसल्याच्या कारणावरून हत्या केली. हत्येतील आरोपी इक्बाल शेख आणि रुपाली यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच ती इक्बालच्या घरी राहायला आली. रुपाली हिंदू होती आणि लग्नानंतरही ती मुस्लिम प्रथा पाळत नव्हती. यामुळे इक्बाल आणि त्याचे कुटुंब संतप्त झाले रुपालीवरही बुरखा Burkha, divorce घालण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे यामुळे या दोघांमध्ये कायम वाद होत होते. यादरम्यान रूपालीला एक अपत्यही झाले होते . रोजच्या भांडणामुळे तिने वेगळे राहणं सुरू केलं. याशिवाय रुपालीने इक्बालकडे घटस्फोट मागितला होता आणि अपत्याचा ताबाही दिला नव्हता.
 
एका वृत्तानुसार, इक्बाल शेख याने रुपालीला सोमवारी संध्याकाळी चेंबूरमधील पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. Burkha, divorce यानंतर इक्बालने तिला जवळच्या रस्त्यावर नेले आणि वाटेत चाकू हल्ला करत पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुपालीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बालला काही वेळात अटक केली
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0