ओबीसी उमेदवारांसाठी अभिनव याेजना:
जळगाव : महाज्योतीने संशोधनात्मक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील उमेदवारांसाठी महाज्योती संस्थेकडून यंदा राज्यभरातील २०० विद्यार्थ्यांना पीएच.डी. व एम. फिलसाठी फेलोशिप दिली जाणार आहे. प्राप्त अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणीही सुरू आहे. लवकरच यातून निवड यादीही जाहीर केली जाणार असल्याचे महाज्योतीकडून सांगण्यात आले.
महाज्योतीने संशोधनात्मक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी फेलोशिप सुरू केली आहे. यातून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते. पात्र उमेदवारांचे स्क्रीनिंग केले जाईल. त्यासाठी निवडीचे विशेष निकष लावले जातील. या निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड यादी जाहीर होईल.
कागदपत्रांच्या तपासणीमध्ये प्रामुख्याने महाज्योतीकडे केलेली नोंदणी. विद्यार्थ्याने शैक्षणिक अर्हता पूर्ण केली आहे का? निवडलेल्या विषयाला यूजीसीची मान्यता आहे का? योग्य गाइडची उपलब्धी आहे का? मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ या बाबींची तपसाणी केली जात आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
अशी मिळेल फेलोशिप
पाच वर्षांसाठी फेलोशिप आहे. त्यात प्रथम तीन वर्षांसाठी दरमहा ३१ हजार रुपये तर उर्वरित दाेन वर्षांसाठी प्रतिमहा ३५ हजार रुपये फेलोशिप दिली जाईल.