काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

17 Sep 2022 17:43:49
मुंबई : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित Manikrao Gavit (८७) यांचे शनिवारी सकाळी नाशिकच्या सुयश रुग्णालयात निधन झाले. 12 सप्टेंबर रोजी त्यांना उपचारासाठी सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातील धुलीपारा मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
 

gavit 
 
 
 
नंदुरबार जिल्ह्यातील  धुळीपाडा गावात शोककळा 
 
माणिकराव गावित Manikrao Gavit यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या धुळीपाडा गावात एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला. त्याचे वडील होडल्या बोंडा गावित गावातील गरीब शेतमजूर होते. त्यामुळेच माणिकराव गावित यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. नवापूर गावात आणि परिसरात तरुणपणी त्यांनी राजकीय कार्याला सुरुवात केली. परिणामी 1965 मध्ये त्यांची नवापूर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली. येथूनच त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वनमजूर संस्थांमध्ये काम करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
 
माणिकराव गावित हे 1980 मध्ये पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे Manikrao Gavit आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर लगेचच 1981 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि 2009 पर्यंत सलग 9 वेळा लोकसभेचे सदस्य राहण्याचा मान त्यांनी पटकावला. माणिक राव गावित यांनी 22 मे 2004 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. माणिकराव गावित हे दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री होते. त्यांची मुलगी निर्मला गावित या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि मुलगा भरत गावित हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0