पंतप्रधानांना मिळालेल्या1200 हून अधिक भेटवस्तूंचा आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत लिलाव

17 Sep 2022 11:44:03
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 1200 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा आज शनिवारपासून लिलाव सुरू होणार आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या वस्तू संबंधित संकेतस्थळावरही पाहता येतील, असे जी. किशन रेड्डी म्हणाले. हा लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी 2019 मध्ये लोकांसाठी खुल्या बोलीद्वारे लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी पहिल्या फेरीत 1805 भेटवस्तू आणि दुसर्‍या फेरीत 2772 भेटवस्तू लिलावात ठेवण्यात आल्या होत्या. 2021 मध्ये सप्टेंबरमध्येदेखील ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता आणि लिलावात 1348 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे 1200 स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू ई-लिलावात ठेवण्यात आल्या आहेत.
 

lilav 
 
 
 
लिलावामधील स्मृतीचिन्हांमध्ये उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा समावेश आहे. यापैकी अनेक वस्तू म्हणजेच पारंपरिक पोशाख, शाल, पगडी, समारंभातील तलवारी नेहमी दिल्या जातात. अयोध्येतील राममंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती व नमुन्यांचा समावेश असलेल्या इतर स्मृतीचिन्हांचाही यात समावेश आहे. आमच्याकडे क्रीडा विषयक संस्मरणांचाही आकर्षक विभाग आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, डेफलिम्पिक्स तसेच थॉमस चषक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आपण क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात मानाचे स्थान आणि पदकांची भरघोस कमाई केली. क्रीडा स्पर्धांतील यशस्वी संघ आणि विजेते यांनी दिलेल्या संस्मरणांचा देखील लिलाव होत आहे. लिलावाच्या या भागात 25 नवी क्रीडा संस्मरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे सांगताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व gift auction भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न देशाची जीवनवाहिनी असणार्‍या गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमामि गंगे’ या समाजकल्याणकारी कार्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0