मलकापूर : पोलिसात भरती होण्यासाठी शारीरिक चाचणी पास होणे आवश्यक असते . त्याचीच तयारी म्हणून मोताळा तालुक्यातील दोन तरुण सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलीसभरतीची तयारी करणाऱ्या दोन युवकांचे हात कापल्या गेल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्र.एम.एच.40 एन 9121)बस पिंपळगाव देवी जात होती. दरम्यान या बसच्या बाजूचा पत्रा बाहेर निघालेला होता. दरम्यान पिंपळगाव देवी रोडवर सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या हाताला या भरधाव बसचा पत्रा लागल्याने यात दोन्ही तरुणांनांचे हात शरीरापासून वेगळे झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली असून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हात कापलेल्या तरुणांनाच नाव विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे आहे. हे तरुण पोलीस भरतीची तयारी करत असून नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते. पुढे आलेल्या माहितीनुसार, या बसचा पत्रा आधीच तुटलेला होता आणि तो बसच्या बाहेर निघाला होता. सकाळी बस मलकापूर आगारातून निघाल्यावर पिंपळगाव देवी रोडवर मॉर्निंगवॉकला निघालेल्या या दोन युवकांना बसचा धक्का लागला आणि यात दोघांचेही हात धडावेगळे Youth hands झाले. दोन्ही तरुणांना तात्काळ मलकापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान बसच्या चालकाला धामणगाव बढे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत कळताच नागरिकांनी मलकापूर डेपोमध्ये तोडफोड केली असून येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.