उमेश कोल्हे हत्या प्रकरण: आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून दोन लाख रुपयांचे बक्षीसाची मोठी घोषणा

    दिनांक : 13-Sep-2022
Total Views |
अमरावती: अमरावतीमधील उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​फिरोज अहमदवर NIA नं बक्षीस जाहीर केलं आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचं NIA ने याबाबत घोषणा केली आहे. या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली आहे.
 
 

hatya 
 
 
 
यामधील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम असल्याची माहिती मिळाली आहे. अमोल कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं ही हत्या करण्यात आल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या बाजूने चौकशी सुरू केली. हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला अटक करण्यात आली.
 
मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणी NIA ने आता त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
 
नेमकं काय प्रकरण
 
उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यावेळी उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. मुलगा संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते, अशी माहिती अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली होती.