नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना सिडकोत उघडकीस आली. डॉ. उल्हास कुटे हे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेला डॉक्टरने बोलावले व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला . या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५०, रा. सिडको) हे रात्री 10.30 च्या सुमारास सिडको येथील त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये गेले असता, त्याच ठिकाणी राहणाऱ्या 16 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेच्या रूममध्ये एकटी असल्याची संधी साधत हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूममध्ये प्रवेश करत दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला काढून धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड ठाण्यात संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात भा.द.वी. कलम ३७६, ५०४, तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्ट कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे व डॉक्टरला अटक झाली आहे. सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करीत आहेत.