मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला तब्बल 39 दिवसांनंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. पहिल्या टप्प्यात आज भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली.
राज्याच्या पहिल्याच कॅबिनेट विस्तारात एकही महिला मंत्री नाही!
दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आलं. त्यामुळे मंत्रिपदाची आस धरून बसलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील आमदारांसोबतच्या बैठकीत या नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे प्रचंड नाराज झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत संजय शिरसाट हे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आक्रमकपणे हल्ला चढवताना दिसत होते. त्यामुळे संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जात होते. परंतु, आता मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाल्याचे समजते.
शिंदे गटाकडून कुणी घेतली शपथ
तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात ९ आमदारांना यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. याशिवाय भाजपकडून सुद्धा पहिल्या टप्प्यात ९ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा