प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

09 Aug 2022 11:11:35
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत असून मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती, असे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये पटवर्धन यांनी आपला ठसा उमटवला. 
 

patavardhan 
 
 
 
त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी Marathi actor नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘ गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धनांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी सिनेमामध्येही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊस फूल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या मोरुची मावशी या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0