इस्लामाबाद : भारत जसा स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करीत आहे . तशीच पाकिस्तानही या वर्षी आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. अंतराळ ते तंत्रज्ञानाच्या जगात भारत प्रगती करत असताना, पाकिस्तान गरीब होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक गुलाम झाला असल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.
पाकिस्तानचे Pakistan slave पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी थेट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर आरोप करत हे पाकिस्तानच्या विनाशाचे कारण असल्याचे म्हटले आहे. शहबाज शरीफ म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही, आयएमएफने रोखीची कमतरता असलेल्या देशाला "आर्थिक गुलाम" बनवले आहे आणि अर्थव्यवस्था जागतिक संस्थांवर अवलंबून आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता, परकीय चलनाच्या साठ्यात झालेली घट, आयएमएफकडून कर्ज मिळण्यास विलंब आणि रुपयाचे अवमूल्यन याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. किरकोळ जखमा आता नासूर झाल्या आहेत, अशी स्थिती आहे. प्रचंड कर्जाखाली दबलेल्या देशाने संकटातून बाहेर पडण्यासाठी नाणेनिधीकडे तातडीच्या आधारावर आर्थिक मदत मागितली आहे.
पाकिस्तानवर 75 वर्षातील सर्वात वाईट परिस्थिती
एका वृत्तवाहिनीच्या Pakistan slave मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आघाडी सरकार आव्हानात्मक निर्णय घेत आहे. सरकारसमोर अनेक आघाड्यांवर कठीण आव्हाने आहेत. पाकिस्तानने गेल्या महिन्यात आयएमएफसोबत कर्मचारी स्तरावरील करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सरकारने इंधन आणि वीज सबसिडी रद्द करण्याबरोबरच करजाळे वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पाकिस्तानला शक्य तितक्या लवकर प्रोत्साहन पॅकेजची अपेक्षा आहे परंतु नाणेनिधीने अद्याप निधीचा हप्ता जारी केलेला नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर लोकांमध्ये लोकप्रियता टिकवण्यासाठी आयएमएफच्या अटींचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप शरीफ यांनी वारंवार केला आहे.