वाळू चोरीप्रकरणी जिल्हाभरात १७१ वाहनांवर कारवाई

30 Aug 2022 09:51:19
 
 गौण खनिज विभागातर्फे ११ गुन्हे दाखल तर दोन कोटींच्यावर दंड
 
 
जळगाव - जिल्ह्यात गेल्या १२-१३ वर्षांत अवैध वाळू वाहतूकीचा प्रश्‍न गंभीर आहे. अवैध वाळू उत्खननाव्दारे होणारी वाहतूक चोरी प्रकरणी गौण खनिकर्म विभागातर्फे आतापर्यंत जिल्ह्यात १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर दोन कोटी १६ लाख ८७ हजार ७०४ रूपये दंडात्मक रकमेपोटी ५९ लाख ४२ हजाराहून अधिक रकमेचा भरणा शासन तिजोरीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
 
 
 

m1 
 
  
 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग प्रादूर्भावामुळे गौण खनिकर्म विभागाला उद्दीष्टापैकी वसुली बर्‍यापैकी आहे. तर दुसरीकडे अवैध वाळू वाहतूकीमुळे बहुतांश वाळू गटांचे लिलावापासून मिळणार्‍या महसूली उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे २०२२-२३ आर्थीक वर्षात तत्कालीन राज्य सरकारकडून नियमित गौण खनिज महसूली उत्पन्नापेक्षा ३४ टक्क्यांहून अधिक घट करण्यात आली आहे.
 
सर्वात जास्त जळगाव आणि चाळीसगाव तालुक्यात कारवाई ; १०८ वाहने जप्त
 
अवैध वाळू उत्खनन प्रकरणी १७१ वाहनांपैकी १०८ वाहने विविध तालुकास्तरावर जप्त झाली आहेत. जळगाव तालुक्यात सर्वात जास्त २८ वाहने, ४५ लाख ३२ हजार ५०१ रूपये दंडात्मक कारवाईपोटी सर्वच २८ वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा आहेत. जळगाव -२८(), जामनेर ५(२), एरंडोल ६(३), धरणगाव ८(५), पारोळा ११(७),भुसावळ ९(८), बोदवड २(०), मुक्ताईनगर ५(४), यावल ११(६), अमळनेर ५(५), चोपडा ७(५), पाचोरा १३(१०), भडगाव १६(४), चाळीसगाव २४(८)अशी एकूण १७१ वाहनांवर कारवाई तर १०८ वाहने जप्त आहेत.
 
 
जिल्हाभरात जानेवारी ते जुलै दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणार्‍या १७१ वाहनांवर दोन कोटी १६ लाख ८७ हजार ७०४ रूपये दंडात्मक कारवाईसह ११ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ५९ लाख ४२ हजार ४०४ रूपये दंड शासन तिजोरीत जमा झाला आहे. याकारवाईत ६३ वाहने दंड व बंधपत्र घेउन सोडण्यात आली असून १०८ वाहने विविध तालुकास्तरावर जप्त आहेत.
 
दीपक चव्हाण,
 
जिल्हा गौण खनिकर्म अधिकारी, जळगाव.
Powered By Sangraha 9.0