वातावरणाचा लहरीपणा!

03 Aug 2022 11:03:30

वेध


environment वातावरणातला म्हणा किंवा हवामानातला लहरीपणा दिवसेंदिवस वाढतो आहे. ऋतुचक्रानुसार जून महिन्यात पावसाळा सुरू होतो.

 
 
 
vatavaran

 

 
 
पण, गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात अपेक्षेनुरूप पाऊस येतच नाही. जुलैपासून त्याची सुरुवात होते. यंदाही तेच झाले. हिवाळा आणि उन्हाळ्याचेही हेच समीकरण रुढ होताना दिसते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वातावरणातले उष्णतामान दिवसेंदिवस वाढत आहे. मानवासह प्राणी, पशु व पक्ष्यांच्या जीवनावरही त्याचे परिणाम वेगवेळे रोग व आजारांच्या माध्यमातून दिसायला लागले आहे. environment वातावरणातल्या या बदलावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक पातळीवर सातत्याने मंथन होत आहे. काही उपाय सुचविण्यात आले. परंतु, त्या उपाययोजनांची अमंलबजावणी वाटते तेवढे सोपे काम नाही. जागतिकीकरणाच्या लाटेतून प्रत्येकाची बदलेली जीवनशैली ही त्यापाठीमागची मोठी अडचण आहे. ती पूर्ववत होणे कठीण असले तरी त्यात सुधारणा निश्चित होऊ शकतात. त्यासाठी व्यापक स्वरूपात अभियान हाती घेतल्यावरच पदरात काही पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारलाच त्यासाठी ठोस पुढाकार घ्यावा लागणार आहे.
 

environment वातावरणातल्या लहरीपणाचे बोलके उदाहरण म्हणजे, जुलै महिन्यातल्या तीन आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस आणि शेवटच्या आठवड्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचे आहे. सध्या याच स्थितीचा अनुभव विदर्भासह महाराष्ट्रात व देशातल्या काही भागातली जनता घेत आहे. 'ला निना'चा हा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलैच्या सुरवातीला संथपणे सुरू झालेला पाऊस पुढे विक्राळ रूप धारण करून इतका कोसळला की, मोठमोठ्या धरणांचे दरवाजे उघडावे लागले. बहुदा हे पहिल्यांदाच घडले. साधारणपणे जून, जुलै व ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यातल्या पावसानंतर धरणाची दारे उघडण्याची वेळ यायची. यंदा ती जुलै महिन्याच्या मध्यंतरातच उघडल्याने नवा विक्रम स्थापित झाला आहे. हा एक वेगळा प्रसंग अनुभवला जात असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्या क्षणापासूनच environment वातावरणातला उष्मा उन्हाळ्याप्रमाणे जाणवायला लागला. इतका पाऊस झाल्यानंतरही उन्हाची वाढलेली तीव्रता आणि त्यातून वाढलेला उष्मा सर्वांनाच हैराण करतो आहे. उन्हाळ्यात होते तशी गरमी सध्या होत आहे. आश्चर्यचकित करणारा हा बदल असून हवामान तज्ज्ञांना चिंतन करायला लावणारा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ऋतुमध्ये सातत्याने असा बदल दिसतो आहे. या वातावरण बदलाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्या कारणांचे मूळ ग्लोबल वॉर्मिंगच असल्याचे जाणकार म्हणतात.

 

पावसाचा हा असमतोल पिकांसाठी अजिबात चांगला नाही. पेरणीनंतर लगेच आलेल्या मुसळधार पावसाने मोठी हानी झाली आहे. जे काही जमिनीत शिल्लक राहिले तेही टिकेल की नाही अशी स्थिती ढगाळ environment वातावरण व वाढलेल्या उष्म्यामुळे निर्माण झाली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास उत्पादनात निश्चितपणे मोठी घट होईल. त्याचे गंभीर परिणाम समोर येतील. हवामानातल्या या बदला संदर्भात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड म्हणतात, मागील आठवड्यापर्यंत मध्य भारतावर सक्रिय असलेली मान्सूनची ट्रफरेषा सध्या उत्तरेकडे सरकली असल्याने उत्तर भारत तसेच हिमालयाच्या पायथ्याशी मान्सून सक्रिय आहे. परंतु, पुढील तीन चार दिवसात ही ट्रफ पुन्हा खाली (दक्षिणेकडे) सरकण्याची शक्यता असल्याने 6 ऑगस्ट पासून विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी जाहीर झालेल्या भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 'ला निना' (प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागतल्या पाण्याची होणारी तापमान वाढ) स्थिती पुढील काही महिने कायम राहणार आहे. 'ला निना'ला निष्प्रभ करणारा एमजेओ सुद्धा अनुकूल राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सरासरी ऐवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात पश्चिम विदर्भात सरासरी पेक्षा जास्त तर पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील दहा दिवसात विदर्भात सर्वसाधारणपणे 100 ते 250 मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. या अंदाजात बदल अपेक्षित आहे. एकंदरीतच environment वातावरणातला लहरीपणा कायम राहील, अशी स्थिती सध्या तरी आहे.

 
- गिरीश शेरेकर
 

- 9420721225

Powered By Sangraha 9.0