दुर्दैवी... आसोदा रेल्वे गेट समोर धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

17 Aug 2022 15:29:10
 
सुनसगावात शोककळा; नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
 
जळगाव- आसोदा रेल्वे गेट समोर धावत्या रेल्वेखाली तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखन संजय सोनवणे (वय-२२) रा. सुनसगाव ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. दोन वर्षांपुर्वी तरूणाच्या वडीलांनी देखील धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

sucide
 
 
 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह सुनसगाव येथे वास्तव्याला आहे.व येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. बाहेर जावून येतो असे घरात सागुन गेलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खंबा क्रमांक ४३३/२१ येथे पवन एक्सप्रेस समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला ओळख पटलेली नव्हती. पण खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला . आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
लखन सोनवणेचे वडील संजय सोनवणे यांनी अंदाजे दोन वर्षांपुर्वी याच पध्दतीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे सुनसगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयताच्या आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0