औरंगाबादकरांनी शोधला पेट्रोल-डिझेलला नवा पर्याय
औरंगाबाद - पेट्रोल-डिझेलच्या (Petrol - Diesel) दरामुळे त्रस्त झालेल्या जनतेने आता पेट्रोल डिझेलला रामराम ठोकत नवा पर्याय शोधला आहे. या नव्या पर्यायांमुळे बियर कॅपिटल, टुरिझम कॅपिटल आणि उद्योग नगरी असलेल्या औरंगाबादची नवी ओळख निर्माण होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत आता सगळ्यांनाच दररोज याचे चटके बसत आहेत . त्यामुळे या पेट्रोल डिझेलच्या दरालाच झटका देण्याचं काम औरंगाबादकरांनी केलं आहे. कारण औरंगाबाद शहरात सध्या इलेक्ट्रिक कार आणि मोटार सायकलची धूम आहे. या वर्षात तब्बल २ हजार ३७५ इलेक्ट्रिक वाहन औरंगाबादच्या रस्त्यावर धावत आहे.
२०२२ या वर्षात औरंगाबादच्या रस्त्यावर धावताहेत इतकी इलेकट्रीक वाहने -
-१७०० इलेक्ट्रिक टू व्हीलर,
- तब्बल ४०० इलेक्ट्रिक फोर व्हीलर,
- २५ प्रवासी रिक्षा
- आणि २५० इलेक्ट्रिक मालवाहू रिक्षा
औरंगाबादच्या रस्त्यावरइतका इलेकट्रीक वाहने धावत आहे. काही महिन्यातच विक्री वाढल्याने शहरात ईव्हीचे १६ वितरक आहेत. त्यात ई-कारचे ३, इ-स्कूटर्सचे १०, ई-रिक्षाचे ३ असे प्रमुख १६ वितरक आहेत.
एकाच वेळी २०० चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आहेत. त्यानंतर कार, एसयूव्ही कारची धडाक्यात विक्री सुरू आहे. सध्या ई-स्कूटर्सला चांगली मागणी आहे. साधारण १ लाख ते दीड लाख ई-स्कूटर्स विकल्या जात आहेत. मागील वर्षभरात १७०० दुचाकी विक्री झाल्या आहेत.
ई-कार साठी पूर्वी वर्षभराची प्रतीक्षा होती. मात्र आता विदेशातून येणाऱ्या पार्टचा पुरवठा वाढत आहे. यामुळे ही प्रतीक्षा यादी ४ ते ५ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या पाच सहा महिन्यातच औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दहा हजारापेक्षा पुढे जाईल अशी शक्यता आहे.
पेट्रोल, डिझेल आणि आता सीएनजीच्या वाढत्या किमतीनी वाहनधारक इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड वाहन खरेदीकडे वळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची प्रतीक्षा यादी कमी झाल्याने पुन्हा दर महिन्याला नवीन ई-वाहन रस्त्यावर धावताना दिसून येत आहे. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येऊन मोहीम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून एका दिवसात शहरात २०० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या होत्या.
.
इलेक्ट्रिक कारच्या किमती साधारण १२ लाखापासून पुढे आहेत. त्यात सबसिडीही मिळत आहे. त्यासोबत ई-वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट महत्त्वाचे असतात. औरंगाबाद शहरात सुमारे २० ठिकाणी चार्जिंग पॉईंट आहेत.
शिवाय आता औद्योगिक वसाहतीत व बीड बायपास, सोलापूर- धुळे, औरंगाबाद- जालना, नगर, मुंबई रोडवर ई कारसाठी चार्जिंग पॉईंट वाढविणे आवश्यक आहे. सध्या दुचाकीचे चार्जिंग घरीच केले जाते. चार्जिंग पॉईंट वाढले तर ई-वाहनांची निश्चित विक्री वाढेल, यात शंका नाही. पण पेट्रोल डिझेलसाठीला पर्याय देत औरंगाबादकरांनी आपलं शहरच इलेक्ट्रिक व्हेईकल हब करायचं ठरवलं आहे.