स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून वाद...चार जणांना अटक

16 Aug 2022 10:49:52
 
शिवमोगा : कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे Controversy फलक लावण्यावरून वाद आणि हल्ला प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांची ओळख पटली असून नदीम (२५) आणि अब्दुल रहमान (२५) अशी त्यांची नावे आहेत. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दोन गटांत हा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त कर्नाटकमधील शिवमोगा येथील अमीर अहमद सर्कल परिसरात स्वातंत्र्यवीर सावकर यांचे पोस्टर लावण्यावरून वाद झाला होता. या वादाच्या काही तासानंतर प्रेमसिंग नावाच्या एका व्यक्तीवर गांधी बाजार परिसरात चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये ही व्यक्ती जखमी झाली होती. या घटनेनंतर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 

vad1 
 
 
 
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आसून एकूण चार आरोपींना अटक केली आहे. यातील दोघांची नावे Controversy नदीम आणि अब्दुल रहमान अशी आहेत. घटनेनंतर पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथील जिल्हाधिकारी आर सेल्वामणी यांनी शिवमोगा शहर तसेच भद्रावती शहर परिसरातील शाळा मंगळवारी (१६ ऑगस्ट) बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0