अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता

09 Jul 2022 17:19:45
गुरुकृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून  गेले होते अमरनाथला
 
पिंपरी-चिंचवड : शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ  गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक जम बेपत्ता झाले आहेत. अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू यात्रेला गेले होते. यात बेपत्ता झालेल्या या सात भाविकांचा समवेश होता.
 
 

dhagfuti
 
 
 
अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर मोठी जिवीत हानी झाली आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून, 40 बेपत्ता असल्याची माहिती आहे. याच काळात आळंदीतून आलेले सात यात्रेकरु बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आळंदीमधील गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील सात जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना या घटनेनंतर पाहिले असल्याचा दावा यात्रा कंपनीच्या चालकाने केला आहे.
 
आळंदीतून 200 यात्रेकरु हे गुरुकृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून अमरनाथला गेलो होते. 25 जूनला हे भाविक अमरनाथच्या यात्रेसाठी पोहचले असल्याची माहिती आहे. कालच्या ढगफुटीच्या घटनेनंतर यातील सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते आहे. तर त्यांना घटनेनंतर पाहिले असल्याचे शुभम खेडेकर या यात्रा कंपनी चालकाने सांगितले आहे. आता या सात जणांचा शोध घेण्याचे काम सुद्धपातळीवर सुरु आहे.
 
बेपत्ता झालेल्यांची नावे
 
1. अनुसया वाहिले, आळंदी 
2. मंगल ढेरे ,आळंदी
3. लता झेंडे, हंडेवाडी
4. सुलभा पाटील लोहगावॉ
5. शालिनी पाटील ,लोहगाव
6. अनिता जाधव, हंडेवाडी
7. प्रज्ञा जाधव, मोशी
 
ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर यांचा संपर्क झालेला नाही. घटनास्थळी यांचा शोध सुरु आहे. देशातील अनेक राज्यात पूरजन्य स्थिती आहे. तसेच काश्मीरमध्ये देखील मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. ढगफुटी झाल्यामुळे तिथं मोठा पूर आला आहे.
Powered By Sangraha 9.0