वर्धा : विदर्भात सुरु असलेल्या संततधारमुळे अनेक (Wardha district) जिल्ह्यांना फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः तांडव घातला आहे. पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्पाचे १३ गेट २०० सेमीने उघडण्यात आले आहे.
यातून ४२१२ घन.मी/से विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पुर येऊन आष्टी ते मोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. दररम्यान आर्वी तालुक्यातील कोपरा पुनर्वसन येथील २४ वर्षीय एक व्यक्ती बाकडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली होती. जिल्हा बचाव व शोध पथकाने या व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढले आहे
निम्न वर्धाचे ३१ दरवाजे १०० सेमीने उघडणार निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान होत असल्याने आणि अप्पर वर्धाचे पाणी येत असल्याने प्रकल्पातील पाणी सतत वाढत आहे. त्यामुळे आज रात्री १२.३० वाजता पासून ३१ दरवाजे १०० सेंमीने उघडण्यात येणार आहे. प्रकल्पातून २५८२ घन.मी/से ईतका विसर्ग वर्धा (Wardha district) नदीपात्रात सोडला जाणार आहे. यामुळे नदीची पाणी पातळी ८ फुटपर्यंत जाणार आहे. दरम्यान नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान होत असल्याने आणि अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी देखील येत असल्याने रात्री १२.३० वाजता ३१ दरवाजे १०० सेंमीने उघडण्यात आले होते. तर येवा कमी झाल्याने आज सकाळी ७ वाजता पासून ३१ दरवाजे ७० सेंमीने उघडे ठेऊन विसर्ग कमी करण्यात आला आहे. प्रकल्पातून आता १७६२ घन.मी/से ईतका विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडला जात आहे. आर्वी तालुक्यातील कौंढण्यपूर येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने कौढण्यपूर ते आर्वी रस्ता बंद झाला आहे.