कोलकाता : पश्चिम बंगालच्या ED raids मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सहयोगी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ED) मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह काही मंत्री, सरकारी अधिकारी, दलाल आणि खासगी व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. याच दरम्यान 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ईडीने दावा केला आहे की, या छाप्यादरम्यान अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्टाफ सिलेक्शन कमिशन घोटाळ्याशी संबंधित असण्याची शक्यता ईडीला आहे.
ईडीच्या ED raids छाप्यांमध्ये अर्पिताच्या लपून बसलेल्या ठिकाणांवरून 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या पथकाने बँक अधिकारी आणि नोट मोजणी यंत्रांची मदत घेतली. केंद्रीय एजन्सीला संशय आहे की जप्त केलेली रोख रक्कम एसएससी घोटाळ्यात कमावलेली रक्कम असू शकते. अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 हून अधिक मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत, अर्पिता मुखर्जीने इतके फोन का वापरले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. यावरून आता भाजपानेममता बॅनर्जी आणि TMC वर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
ईडीच्या छाप्यात ED raids चॅटर्जी व्यतिरिक्त शिक्षण राज्यमंत्री परेश सी. अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमदार माणिक भट्टाचार्य, आमदार पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय सुश्री अर्पिता मुखर्जी, तत्कालीन एमआयसी ऑफ एज्युकेशन ओएसडी पीके बंदोपाध्याय. पीएस सुकांता आचार्य ऑफ एज्युकेशन, कृष्णा सी. अधिकारी, कल्याणमय भट्टाचार्य यांचे नातेवाईक एमआयसी; पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे सल्लागार - 5 सदस्यीय समितीचे निमंत्रक डॉ. एस.पी. सिन्हा, पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सौमित्र सरकार, शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक आलोक कुमार सरकार यांच्यावर ही छापे टाकले आहे.