नवी दिल्ली: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकांवर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आला होता, आता पुढची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे.
हरिश साळवे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेळ मागण्यात आली. कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड़्याचा वेळ असे सांगितले आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
साळवे यांनी केलेल्या मागणीला कपील सिब्बल यांनी विरोध दर्शविला. कपील सिब्बल हे सध्या युक्तीवाद करीत आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सुध्दा याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. अल्पमतात असलेला नेता गटनेत्याचा काढू शकतो का असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. वेळ वाढवून देण्यात काही अडचण नसल्याचं दिसतंय. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी कपील सिब्बल यांनी केली.
कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर सांगितले की, पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन झाले आहे. हे कायद्याचे उल्लंघन आहे. व्हिपच्या विरोधात मतदान केले. त्यांना अपात्र ठरवावे. राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्याची परवानगी दिली. पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यापासून उपसभापतींना कसे रोखता येईल? मग दुसरे सरकार स्थापन करण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते?