श्रीलंकेत राष्ट्रपतिपदासाठी तिहेरी लढत ; - रानिल विक्रमसिंघेही शर्यतीत

19 Jul 2022 18:25:52
 
कोलंबो :  श्रीलंकेत  अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पद सोडून पळ काढावा लागला. त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी उद्या बुधवारी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत असून, हंगामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह तीन जण या लढतीत आहेत. कट्टर सिंहली बौद्ध राष्ट्रवादी आणि सत्ताधारी Sri Lanka श्रीलंका पोदुजना पेरामुना पक्ष आणि डाव्या विचारसरणीच्या जनता विमुक्ती पेरामुनाच्या फुटलेल्या गटातील सदस्य दुल्लास अलाहपेरुमा आणि डाव्या जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे अनुरा कुमारा दिसानायके यांचे आव्हान विक्रमसिंघे यांच्यासमोर राहणार आहे. या तिघांच्याही उमेदवारीची अधिकृत घोषणा संसदेने केली आहे.
 
 
 

singhe
 
 
अलाहपेरुमा यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून माघार घेत आहोत, असे Sri Lanka श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्ष समगी जना बालावेगयाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी सांगितले. 225 सदस्यीय संसदेने 20 जुलैनंतर नवीन राष्ट्रपतीची निवड करणे अपेक्षित आहे, जे माजी राष्ट्रपती राजपक्षे यांचा उर्वरित कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अलाहपेरुमाला विजयी करण्यासाठी आपला पक्ष काम करेल, असे प्रेमदासा यांनी सांगितले. मला प्रिय असलेल्या माझ्या देशाच्या भल्यासाठी आणि अधिक चांगल्यासाठी तसेच मी ज्या लोकांची कदर करतो, त्यांच्यासाठी मी राष्ट्रपतिपदाची माझी उमेदवारी मागे घेतो. एसजेबी आणि आमची आघाडी आणि आमचे विरोधी भागीदार दुल्लांना विजयी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील, असे प्रेमदासा यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0