राख ठरू नये अभिशाप!

18 Jul 2022 13:02:23
वेध 
प्रत्येकाला प्रगती हवी आहे. ही Power generation station प्रगती करायची झाल्यास आपल्याला विजेची गरज भासते.
याकरिता कोळसा जाळावाच लागतो. आता कोळसा जाळला तर राख तयार होणारच. अशा वेळी त्या राखेची विल्हेवाट लावणेही आवश्यक आहे. कोळशापासून तयार झालेली राख घातक असली, तरी तिचे अनेक चांगले उपयोग आपण करू शकतो. मात्र, तिथेच आपली यंत्रणा कमी पडते अन् मग कोराडी केंद्रातील राख साठवणारा तलाव फुटल्यानंतरचे भयावह रूप समोर येते. आता प्रश्न हा पडतो की, महानिर्मितीने जो काही तलाव राख साठवण्यासाठी तयार केला, तो मजबूत का केला नाही? कुठे आपली यंत्रणा कमी पडली याचाही शोध घ्यायला हवा.
 
 

rakh 
 
 
 
हा तलाव सुमारे 341 हेक्टर क्षेत्रफळात Power generation station विस्तारलेला आहे. सन 2015 मध्ये 65 कोटी रुपये खर्चून याची निर्मिती करण्यात आली. ज्याने कंत्राट घेतले त्याने प्रामाणिकपणा न ठेवताच काम पूर्ण करण्यावर भर दिला होता. म्हणूनच की काय, गावकर्‍यांनी संबंधित कंत्राटदार भिंत बरोबर बांधत नसल्याची तक'ार केली होती. मग कुठल्या अधिकार्‍याने तोडपाणी करीत ती तक्रार दाबली, याचाही शोध घेण्याची वेळ आता आली आहे. तलाव फुटल्याने कामठी तालुक्यातील खसाळा, उप्पलवाडी, कवठा, म्हसाळा, खैरी ही गावे संकटात सापडली आहेत. राख त्या गावात शिरल्याने तेथील भूगर्भातील पाणी खराब होणार आहे. मग पुढे गावकर्‍यांनी पाणी कुठले प्यायचे हाही मुद्दा रक्तदाब वाढविणारा ठरेल.
कोळसा Power generation station जाळल्यानंतर तयार होणार्‍या राखेचा उपयोग आपण रस्ता निर्मिती, सिमेंट निर्मिती, विटा निर्मितीत करू शकतो. एवढेच नव्हे, तर खड्डे भरण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. रस्त्यासाठी राख वापरली तर खर्च कमी पडतो आणि त्याची मजबुतीही वाढते. कोळशापासून उरलेल्या राखेत सिलिकॉन, अ‍ॅल्युमिनिअम, लेड, आर्सेनिक आाणि इतर घातक पदार्थ असतात. जेव्हा ही राख पाण्यात मिसळते तेव्हा प्रदूषण वाढते. हलकी राख श्वासापोटी फुफ्फुसात गेली तर श्वसनरोग माणसाला जडतात.
आता कोराडीचा Power generation station तलाव फुटल्यानंतर या सर्व गोष्टी संबंधित गावात वाढणार, हे तेवढेच खरे आहे. आता ही परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये याकरिता ठोस कृती करण्याची गरज आहे. त्याकरिता ज्या तलावात राखेची साठवणूक केली जाते, त्याचे खोलीकरण करायला हवे. शिवाय तलावाच्या सभोवताल सुरक्षित मजबूत अशी भिंत उभारण्याचीही गरज आहे. जेणेकरून काहीही झाले तरी तलावातील राख बाहेर येणार नाही. पण याकरिता महानिर्मिती खरोखरच प्रयत्न करेल काय? कोराडी असो किंवा खापरखेडा या वीज केंद्रांमुळे लोकांची प्रगती वेगाने झाली. मात्र, ज्या काही समस्या उद्भवल्या त्याकडे कानाडोळा करता येणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. Power generation station वीज केंद्र सुरू झाले तेव्हापासूनच राखेचा प्रश्न कायम आहे. आपल्याला आता राखेच्या समस्येवर रामबाण तोडगा काढावाच लागणार आहे. ज्या गावात राखयुक्त पाणी घुसले तेथील भूगर्भातील जलसाठे खराब तर होणार नाही ना? याचाही तातडीने अभ्यास करावा लागेल. कळमेश्वर शहरात जमिनीतील पाणी एका कंपनीमुळे कायमस्वरूपी खराब झाले. तीच अवस्था याही गावात झाली तर फार मोठी बिकट समस्या उभी राहील. असा प्रकार घडू नये म्हणून तलावातील राखयुक्त पाणी कुठेही जाणार नाही, याची तजवीज करायलाच हवी.
औष्णिक केंद्रात दररोज लाखो टन कोळसा जाळला जातो. त्यामुळे राख तयार होईलच ना? ती राख इतरत्र उपयोगात यावी म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण तलावाची भिंत नेमकी फुटलीच कशी? यामुळे झालेल्या Power generation station नुकसानाचे काय? आता गावकर्‍यांचे झालेले नुकसान ते अधिकारी व कंत्राटदार स्वत:च्या खिशातून भरून देणार काय? वस्तुत: तलावाची भिंत फुटली ही नैसर्गिक आपत्ती नाही तर काम निकृष्ट केले यामुळे हे मानवनिर्मित संकट ओढवले आहे. यामुळे नुकसान भरपाई द्यायची झाल्यास ती चूक करणार्‍यांकडून वसूल करायला हवी. हा पायंडा पडला तर कदाचित पुढील काळात कंत्राटदार असो किंवा अधिकारी चुकीचे काम करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील. तसे पाहता तलावाची भिंत फुटली एवढे हे साधे प्रकरण नाही. याची चौकशी झाली तर समुद्र मंथनच होईल. त्यावेळी Power generation station मंथनातून खूप काही निघाले होते. असेच घबाड याही चौकशीतून पुढे येईल. हे झाले तर तलाव मंथन राखेच्या सदुपयोगासाठी दिशादर्शक ठरेल.
- अनिल फेकरीकर

- 9881717859
Powered By Sangraha 9.0