भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा डाव

16 Jul 2022 11:07:06
 
वेध-
बिहार पोलिसांनी राजधानी पाटणा येथे देशविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. या कारवाईनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
 

zarkhand 

 
ती म्हणजे अटक करण्यात आलेल्यांपैकी एक झारखंड पोलिसमधील निवृत्त पोलिस अधिकारी असून त्याचे नाव मोहम्मद जलालुद्दीन आहे. तर, दुसरा पीएफआयचा सदस्य आहे. त्याचे नाव अतहर परवेझ आहे. सिमीवर बंदी आल्यानंतर ही संघटना पीएफआय नावाने सुरू झाल्याचे सांगण्यात येते. पाटणा पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर हे दोघे मार्शल आर्टच्या नावाखाली दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पीएफआय-एसडीपीआयचे मिशन 2047 हे गुप्त दस्तावेज हस्तगत करण्यात आले.
 
भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे त्यात म्हटले आहे. 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचवेळी भारत हे Islamic nation इस्लामिक राष्ट्र करण्याचे मिशन 2047 चे षड्यंत्र आहे. जर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. तर, इस्लामिक राष्ट्र करण्याची मागणी गैर कशी, असा युक्तिवाद एका वाहिनीवरील चर्चेत करण्यात आला. यावरून इस्लामिक दहशतवादाची पाळेमुळे आता देशातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व प्रत्येक राज्यातील मुसलमानांच्या गल्लोगल्ली, घराघरांत पोहोचविण्याचे कारस्थान सुरू असल्याचे या कारवाईने उघड झाले आहे. दोन महिन्यांपासून परराज्यातून लोक येत होते, असे पोलिसांनी सांगितले. तिकीट काढताना व मुक्कामाच्या ठिकाणी नाव बदलवून ते राहत होते. मार्शल आर्टच्या नावाखाली तलवार व चाकू वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. त्यांनी त्या तरुणांना धार्मिक हिंसाचारासाठी प्रवृत्त केले. तर, परवेझने यासाठी लाखो रुपयांची देणगी गोळा केल्याचे एसएसपीने सांगितले. त्यांना पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की इत्यादी मुस्लिम देशातून पैसे मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे. लुटारू मुघलांच्या टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. सुरुवातीला मोठी लूट केली. त्यानंतर या देशावर सत्ता स्थापन केली. मुघल शासकांनी अत्यंत क्रूरपणे अत्याचार केले. मंदिरांचा विध्वंस केला. पण, त्यांना या देशाचे Islamic इस्लामीकरण कधीच करता आले नाही.
 
त्यांची सत्ता गेल्यावरही धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत. ते आजही सुरूच आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन 2047 अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे. पण, हे षडयंत्र फसले. इंडिया व्हिजन 2047 या मथळ्याखाली सामायिक केलेल्या आठ पानांच्या दस्तावेजातील एका उतार्‍यात म्हटले आहे की, पीएफआयचा असा विश्वास आहे की, मुसलमानांच्या एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्केच लोक त्यामागे असले, तरी (म्हणजे शरीया कायदा ज्यांच्या डोक्यात भिनला आहे असे) पीएफआय बहुसंख्य समुदायावर नियंत्रण ठेवू शकते. ते मुस्लिमांचे गतवैभव परत आणतील. म्हणजे भारतावर इंग्रजांची सत्ता स्थापन होण्यापूर्वी मुघलांची सत्ता होती. हा देश मुस्लिम राज्य होता, असे ते मानतात. स्वातंत्र्यप्राप्तीला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा 2047 मध्ये भारताला पुन्हा Islamic nation इस्लामिक राष्ट्र करण्याचा गौरव प्राप्त करू, असे त्यांचे लक्ष्य आहे. अटक करण्यात आलेले दोघेही भरकटलेल्या आणि अशिक्षित तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्यासाठी देशाच्या विविध भागात फिरत होते, हे देखील उघड झाले आहे. पाटणा येथील गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती. या सभेदरम्यान बॉम्बस्फोट झाले होते, हे वाचकांच्या स्मरणात असेलच. तर, त्या प्रकरणातील अनेक आरोपींना सोडविण्यासाठी, त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी अतहर परवेझ प्रयत्न करीत होता, अशीही माहिती फुलवारी शरीफ पोलिस उपविभागाचे अधिकारी मनीष कुमार यांनी दिली आहे. या कारवाईवरून देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाटणा येथील पोलिसांनी अटक केलेल्यांच्या संपर्कात देशातील इतर राज्यातील कोण कोण व किती तरुण आहेत किंवा होते, याचा शोध गुप्तहेर विभागाने घेतला पाहिजे. या कारस्थानाच्या मुळाशी जाऊन त्यांचा खात्मा करणे आता आवश्यक झाले आहे.
 
- विजय कुळकर्णी
 
- 8806006149
Powered By Sangraha 9.0