औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ , शिंदे सरकारकडून नव्याने नामांतरण

16 Jul 2022 13:49:44
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अल्प मतात असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकारने तीन महत्वाचे निर्णय पुन्हा नव्याने घेतले आहेत. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे व नाव देण्यात आले आहे.
 
 
 

CM-DCM
 
 
 
 
दि. बा. पाटील यांच्या भूमिपुत्रांसाठीचे योगदान पाहून हे नाव देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे निर्णय जरी महाविकास आघाडी सरकारच्या काळातले असले तरी त्याची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने या निर्णयावरच शिक्कामोर्तब झाल्याती घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे.
 
शिवाय 29 जून रोजी महाविकास आघाडी सरकारने हे सर्व निर्णय घाई गडबडीत आणि बहुमत नसताना घेतले होते. त्यामुळे हे घटनाबाह्य होते. आता या निर्णयाला 165 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे आता घेतलेले निर्णय हेच घटनेला धरुन असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी यापूर्वी असे निर्णय घेतले असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.
Powered By Sangraha 9.0