गुजरातमध्ये पुन्हा मोठी कारवाई! पाकिस्तानी बोटीतून आणलेलं 250 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

12 Jul 2022 17:34:44
कच्छ: गुजरातमध्ये एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून ड्रग्जची मोठी जप्त करण्यात आली आहे. तसेच ही खेप मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होती, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.यावेळी तर चक्क पाकिस्तानमधील (Pakistan News) बोटमधून आणण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अंमली साठ्यावर कारवाई केली गेली. मुंद्रा बंदरातून 500 किलोचं कोट्यवधी रुपयांचं कोकेन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता जखाऊन बंदराजवळ मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी तब्बल 250 कोटी रुपये किंमतीचे 50 किलो हेरॉईन जप्त (Gujrat heroin Seized) करण्यात आलंय. पाकिस्तानी बोटीतून हा साठा भारतात आणला जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एटीएसने बीएसएफच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सातत्याने ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदाच सुरु आहे की काय? अशी शंका घेतली जाते आहे.
 
 

drug 
 
 
 
 
ड्रग्ज समुद्रात फेकले
 
एटीएस आणि बीएसएफच्या पथकानं अरबी समुद्रात संशयास्पद बोटींचा पाठलाग केला. त्यानंर ही बोटही ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, या बोटीत ड्रग्ज सापडले नव्हता. कारण बोटीतील ड्रग्जच्या पिशव्या समुद्राक फेकल्या गेल्या होत्या. यासाठी पुन्हा वेगळी शोधमोहीम राबवली गेली. या शोधमोहिमेदरम्यान पथकाला तब्बल 49 पिशव्या सापडल्या. या पिशव्यांमध्ये 50 किलो इतकं हेरॉईन सापडलं आहे.
 
कारवाईदरम्यान सापडलेल्या 50 कोटी हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 250 कोटी रुपये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच मिठाण्या गोण्यांमधून ड्रग्जची वाहतूक करण्यात आल्यांचं समोर आलं होतं. याप्रकरणी मुंद्रा बंदरामध्ये कारवाई करण्यात आलेली. इराणमधून मिठाच्या गोण्या असल्याचं सांगून ड्रग्ज बंदरावर उतरवण्यात आलं होतं.
 
जानेवारी महिन्यात पाकिस्तानी बोटीतून तब्बल २५० कोटी रूपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. यावेळी एटीएसकडून जखाऊन बंदराजवळ मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी जवळपास २५० कोटी रूपये किंमतीचे ५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
:
 
Powered By Sangraha 9.0