पंढरपूरचा चेहरामोहरा बदलणार , आजपर्यंत जे झालं नाही ते करणार ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10 Jul 2022 16:31:50
पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा केली. महापुजेनंतर त्यांनी पंढरपूरमधील आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं आश्वासन उपस्थितांना दिलं.
 
 

shinde1
 
 
 
 
'आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी (Pandharpur) करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.' दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या आमदारांचं कौतुक केलं त्यांचे आभार मानले. 'हा मेळावा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा मेळावा आहे, आम्ही केलेलं बंड हे अभूतपुर्व होतं. एकीकडे सत्ताधिश होते. एकीकडे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, पन्नास आमदारांनी विश्वास ठेवणं ही साधीसोप्पी गोष्ट नाही.'
 
या घटनेचे नोंद जगातील ३३ देशांनी घेतली. आम्ही ही एक विचारांची लढाई लढतोय, बाळासाहेबांचे, तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई आहे. आनंद दिघेंच्या कृपेमुळे मी आज इथे आहे. आनंद दिघेंच (Anand Dighe) काम हिमालया येवढं मोठं होतं. प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहिले. शिवसेना हेच माझं ऐश्वर्य म्हणून ते जगले. शाखा हेच घरं त्यांच काम कधीच विसरता येणार‌ नाही. त्याचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यांच काम आहे. ते कधी विसरू शकणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
तसंच आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याशिवाय कोणताही कार्यक्रम सूरु होत नाही. समाजासाठी काम करायचं हे आनंद दिघे यांनी सांगितलं. पद आणि सत्ता मिळवणे साठी उठाव केला नाही. एक जिल्हाप्रमुख काय करु शकतो याचं उदाहरण दिघे सागेबांनी देशाला दिलं आहे. दिघेसाहेब पहाडासारखे माझ्या पाठिशी उभे राहिले.
 
शिवाय आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतो. हे हिदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचही के यावेळी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0