दोन वर्षांपासून Teaching ओस पडलेली शाळा बुधवारी सजली होती. मुलांचा किलबिलाट, शिक्षकांचा उत्साह आणि शाळा व्यवस्थापनासह पालकांच्या चेहर्यावरील आनंद सर्वत्र दिसत होता.
दोन वर्षे ग्रामीण भागात काही ठिकाणी Teaching शिक्षण बंद होते तर शहरी भागांसह काही ठिकाणी आभासी शिक्षण दिले जात होते. ज्या ठिकाणी शिक्षणच बंद होते तेथील मुलांच्या आणि ज्या ठिकाणी आभासी Teaching Start शिक्षण सुरू होते, त्या मुलांच्या समस्या भिन्न असणार आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठीचेही चिंतन पालकांसह शिक्षक व शाळा व्यवस्थापनाला करावे लागेल. शिक्षण हे आभासी असते. असाच समज चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजला असण्याचीही शक्यता आहे. आभासी पद्धतीत शिकतानाचे जे दोष आहेत त्या दोषांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा गुंता हळुवार सोडवावा लागेल. आता कोरोना संकटानंतर 'नवा गडी नवा राज' या न्यायाने शाळा सुरू झाल्या आहेत. हे खरे असले तरी पुन्हा जुनी घडी नव्याने बसविण्यासाठी आणि शिक्षणाचा जुना ओघ पूर्ववत् व्हावा यासाठी सर्वच घटकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने व कोणाकडे जाताही येत नसल्याने विद्यार्थ्यांना मित्र नव्हतेच; परिणामी त्यांचा एकाकीपणा वाढला. आता नव्याने पुन्हा मित्र मिळणार असल्याने हा एकाकीपणा घालविण्याची कसरत करावी लागणार आहे. कोरोना काळात आभासी शिक्षणामुळे शिक्षकांशिवायही आपण उत्तीर्ण होऊ शकतो, ही विद्यार्थ्यांची भावना असू शकते. या भावनेने कदाचित शिक्षकांबद्दल पूर्वी असलेला आदर कमी होऊ शकतो. ही नवी भीती निर्माण झाली आहे. यावरही शाळांना मात करावी लागेल व प्रत्यक्ष Teaching शिक्षण हेच महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावे लागणार आहे व तेही त्यांच्या कलाकलाने. कोरोना काळात जसे अनेक विद्यार्थी पूर्ण अभ्यासक्रमाला मुकले तसेच अनेक शिक्षकही अभ्यासक्रमाच्या जबाबदारीतून मुक्त होते. आता पूर्ण शाळा सुरू झाल्या असल्याने या शैक्षणिक वर्षात तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना नव्या नेटाने प्रयत्न करावे लागतील; शिवाय विद्यार्थ्यांनाही तशी मेहनत घ्यावी लागेल. कारण, दोन वर्षांची शिथिलता भरून काढणे व पूर्वीची मानसिकता निर्माण करणे, हे आव्हानच आहे. प्रत्यक्ष शाळेत शिकविणे आणि आभासी शिकविणे यात अंतर असून कोरोनामुळे शिक्षकांचाही शिकविण्याचा सराव कमी झाला आहे. अशी सर्व आव्हाने शाळेत शिकणारी मुले, त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि या सर्वांसाठी नियोजन करणारे सरकार यांच्यासमोर आहेत. ही सर्व प्रक्रिया सहजतेने कशी होईल, याचा विचार व्हावयास हवा. शिवाय कोरोना काळातील परीक्षा सर्वांना उत्तीर्ण करणार्या झाल्या. त्यामुळे त्यांचा तसा दर्जा नव्हता. पण आता परीक्षा पूर्ण नियमाने होणार असल्याने त्यांचा दर्जाही राखण्याचे आव्हान Teaching शिक्षण विभागापुढे आहे.
- 9422862484