पिंपळनेर, ता.साक्री : येथील एका इसमाचे तालुक्यातील ढोलीपाडा शिवारामध्ये शेत जमीन आहे सदर शेतजमिनीच्या प्रकरणाबाबत पिंपळनेर अप्पर तहसीलदार विनायक थविल यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र वारंवार पैशांची मागणी आणि विविध कारणे देऊन संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडे पैशांची मागणी करीत होते मात्र या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार विनायक थविल यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. तर संदीप मुसळे हा फरार झाला आहे. दरम्यान संबंधित अधिकार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई झाल्यानंतर पिंपळनेर शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून अनेकांनी जल्लोष साजरा केला.
या प्रकरणातील तक्रारदार पिंपळनेर ता.साक्री येथील स्थानिक रहीवाशी असुन त्यांनी ढोलीपाडा येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेत जमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला होता. सदरची शेतजमिन भोगवटादार वर्ग-1 होणे करिता शेतजमिनीचे मालक यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी अप्पर तहसिलदार यांच्याकडे अर्ज केला आहे. सदर प्रकरणात अपर तहसिलदार विनायक थवील यांनी 4 मे 2022 रोजी सदर प्रकरणात 7/12 उतारे व नोंदी सादर केलेल्या नाहीत. हे कारण दाखवून सदरचे प्रकरण तृर्तास निकाली काढले होते.
तक्रारदाराने सदर प्रकरणातील कागदपत्राची पूर्तता करून वेळोवेळी विनायक थविल यांची भेट घेतली. त्यांनी सदर प्रकरणांचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी धुळे कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची माहिती दुरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने पिंपळनेर येथे जावुन तक्रारदाराची तक्रार नोंदवुन घेतली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने 8 जून 2022 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान अप्पर तहसिलदार विनायक सखाराम थवील यांनी खाजगी इसम संदीप मुसळे यांच्याकरवी तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. परंतु त्यांना तक्रारदाराबाबत शंका आल्याने त्यांनी तक्रारदाराकडुन लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
तहसीलदार विनायक सखाराम थवील यांनी इसम संदीप मुसळे यांस प्रोत्साहीत करून तक्रारदार यांच्या डे लाचेची मागणी केली. म्हणुन नमुद आरोपीतांनी स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशिर मार्गाचा अवलंब करून अनाधिकाराने पदाचा दुरुपयोग केला त्यामुळे त्यांच्या विरूध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.