नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे जि.प.च्या जनसुविधा योजनेअंतर्गत एकता चौक ते सुभाष चौकापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन जि.प उपाध्यक्ष ऍड.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, जिल्हाप्रमुख आमाश्या पाडवी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकाची पक्षाने दखल घेत न्याय दिला. सोडून गेलेल्यांचे नुकसान झाले तर एकनिष्ठ राहिले त्यांना न्याय मिळाल्याची भावना जि.प उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांनी व्यक्त केली.
जि.प उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी पुढे म्हणाले की, संकटाच्या काळात धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना. सामान्य शिवसैनिक म्हणून जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे हे काम फक्त शिवसेनाच करू शकते. शिवसैनिक आमदार होत असल्याची बाब भूषणावह आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न आहे. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी केले. याप्रसंगी सरपंच तृष्णा दीपक गवते, जि.प.सदस्या शकुंतला शिंत्रे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, पं.स.सदस्य बेगाबाई भिल आदी उपस्थित होते.
यावेळी जि.प समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून रनाळे गावातील दोघा दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँकेच्या रनाळे शाखाधिकारी गोकुळ नागरे, निरीक्षक अर्जुन नागरे, पं.स. शिपाई सीमा चौकोर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.