शाहरुखला मिळाला फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान

07 May 2022 15:44:43
मुंबई- किंग खान 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करतो आहे. त्याचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. दरम्यान शाहरुखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने मन्नतवर एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते.
 

shaharuh
 
 
 
 
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान नं त्याच्या मुंबईतील मन्नत च्या घरी काही देशांच्या राजदूतांसाठी हाय प्रोफाईल पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा आणि अन्य काही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या ग्रँड पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये शाहरुख त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई करताना दिसत आहे. तसंच त्यांच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे.
 
फ्रान्सचे भारतीय राजदूत Mr. Jean-Marc Séré-Charlet यांनी देखील या पार्टीनंतर एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, 'मुंबईमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये फ्रान्समधील प्रतिष्ठीत असा नागरी सन्मान the Légion d'Honneur, यासाठी बॉलिवूडमधील शाहरुख खान अगदी योग्य आहे. शाहरुखनं दिलेल्या पार्टीसाठी त्याचे मनापासून आभार!' शाहरुखला हा सन्मान त्याने संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक विविधतेसाठी दिलेल्या योगदानासाठी दिला गेला.

कॅनडाच्या राजदूताने केलं भरभरून कौतुक
 
कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी या पार्टीचे काही फोटो ट्विटरव शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी शाहरुखचं भरभरून कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की, ' जगभरातील चाहत्यांना शाहरुख खान किती आवडतो याची मला जाणीव आहे. आमचं प्रेमानं स्वागत केल्याबद्दल गौरी खान आणि शाहरुख खान तुमचे मनापासून आभार. बॉलिवूड आणि कॅनडा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.'
 
अनेकांनी मानले शाहरुखचे आभार
 
@Quebec_India यांनी देखील या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, 'मुंबईतील काही भारतीय राजदूत आणि शाहरुख यांची एक छान संध्याकाळ... बॉलिवूड सुपरस्टारनं क्युबेक सिनेमा आणि तिथल्या अत्याधुनिक स्टुडिओंबद्दल चर्चा केली. हे आमंत्रण दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शाहरुख खान.'
Powered By Sangraha 9.0