आजपासून धावणार जळगावमार्गे नागपूर ते सिकंदराबाद विशेष रेल्वे

07 May 2022 14:35:55
जळगाव : आरआरबी एनटीपीसी 2022 सीबीटी-2 ` परीक्षा 9 आणि 10 मे रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची रेल्वेने 9 आणि 10 मे रोजी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी देशभरात 65 हून अधिक विशेष ट्रेन चालू करण्यात येत आहे.
 
 
 
jal 
 
 
नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान विशेष रेल्वे धावणार आहे. गाडी क्र. ०१२०३ ही ७ मे रोजी नागपूर येथून दुपारी दीड वाजता निघाली आणि निघून सिकंदराबाद येथे रात्री ९.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०४ ही ९ मे रोजी सिकंदराबाद येथून रात्री ८.३० वाजता सुटून नागपूरला पहाटे ५ वाजता पोहोचणार.
 
असे असणार थांबे
 
वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, लिंगमपल्ली या स्थानकांवर थांबा दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0