नंदुरबार : तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु.राधिका महेंद्र शिंदेला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा स्काऊट गाईड राज्य पुरस्कार आणि प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. विद्यालयातील गाईड शिक्षिका श्रीमती चेतना वाघ यांनाही कौटिजेन्ट लिडर म्हणून यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त कु.राधिका महेंद्र शिंदे व कौटिजेन्ट लिडर श्रीमती चेतना वाघ यांचे आणि विद्यालयातील सर्व कर्मचार्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त एस.एस.चौधरी, शिक्षणाधिकारी (माध्य.) मच्छिंद्र कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, नंदुरबार नगरपालिका नगराध्यक्षा तथा जिल्हा आयुक्त गाईड सौ.रत्नाताई रघुवंशी, सरचिटणीस तथा स्काऊट जिल्हा अध्यक्ष यशवंत देवराम पाटील तसेच नंदुरबार तालुका विधायक समितीचे सर्व संचालक, प्राचार्य तथा संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक, स्काऊट गाईड मुख्यालय आयुक्त पुष्पेंद्र रघुवंशी, गाईड जिल्हा संघटन आयुक्त श्रीमती कविता वाघ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा दिल्या.
या वाटचालीसाठी कु.राधिका शिंदेला श्रीमती चेतना वाघ, मुख्याध्यापक जी.एन.परदेशी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे मार्गदर्शन लाभले.