जळगावची तन्वी मल्हारा झळकणार मालिका विश्वात

16 May 2022 21:51:46
जळगाव : शहरातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची कन्या तन्वी मल्हारा हिने चंदेरी दुनियेत नुकतेच पदार्पण केलेलं आहे. 'मुस्कुराने की वजह तुम हो' या मालिकेत कलाकार कुणाल जयसिंग साेबत ती मुख्य भूमिकेत दिसेल. या मालिकेच्या माध्यमातून ती आता घरोघरी पोचणार असल्याने ती अत्यंत आनंदी आहे.
 
 
 
tanvi 
 
 
तन्वी हिने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. मालिकेत निवड झाल्याने तन्वीचा आनंद गगनात मावेनासा होवून जणू काही तिच्यासाठी आकाशच ठेंगणे झालेले आहे. तन्वीच्या या निवडीने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही तिची पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 
 
Powered By Sangraha 9.0