क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

29 Apr 2022 11:22:11


समर्थ नेतृत्व


इ. स. १६०८ साली समर्थ रामदास स्वामींचा Samarth Ramdas Swami जन्म जांब या गावी झाला. पुढे समर्थांनी जनमानसात वयाच्या ७४ व्या वर्षापर्यंत श्रीरामभक्ती, राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रोद्धाराचे कार्य रुजवले.

 

टाकळीला (नाशिक) असताना १२ वर्षे अखंडपणे समर्थांनी एक शिस्तप्रिय जीवनशैली आचरणात आणून स्वत:ची पूर्ण सिद्धता केली. त्यात पहाटे उठणे, नित्यकर्म, जपसाधना करणे, सूर्यनमस्कार, गायत्री आणि श्रीरामाचा जप, दुपारी भिक्षा मागणे आणि सातत्याने विविध ग्रंथांचा अभ्यास यांचा समावेश होता. यानंतरची पुढील १२ वर्षे त्यांनी भारत भ्रमण केले. देशाच्या विविध भागांत त्यांनी Samarth Ramdas Swami संचार केला. त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक भारतीयाचे वैयक्तिक जीवन त्यांनी जवळून अनुभवले. परकीय आक्रमकांनी केलेला विध्वंस, मंदिरांची तोडफोड, देवमूर्तींची विटंबना, लूटमार, स्त्रियांवर अत्याचार, बळजबरीने धर्मांतरण याचे सूक्ष्म निरीक्षण समर्थांनी केले.

 

swami1 

 

 
 
मानवी जीवनाच्या अतिसूक्ष्म निरीक्षणाने समर्थांनी त्यांच्या साहित्याची निर्मिती केली आहे. त्यात मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, एकवीस समासी दासबोध, करुणाष्टके, स्फुट श्लोक, स्फुट प्रकरणे, लघुकाव्ये, ओवीशतके, सवाया, अभंगे, पदे, ललिते, आरत्या, मानसपूजा इत्यादींचा समावेश आहे. परंतु, या सर्व साहित्यात 'दासबोध' हा रामदास स्वामींचा Samarth Ramdas Swami ग्रंथराज म्हणून ओळखला जातो. समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याणस्वामींनी तो लिहिला. एका बैठकीत हा ग्रंथ लिहिला गेला नाही तर वेळ मिळेल तशाप्रकारे लेखन केले गेले. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने हा ग्रंथ पूर्णत्वास आला. २० दशक आणि प्रत्येक दशकात १० समास अशा प्रकारे उत्तमरीत्या या ग्रंथाची निर्मिती केली गेली.
 
व्यवस्थापनाच्या दृष्टीने उत्तम प्रकारे मांडणी केलेला ग्रंथ म्हणजेच श्रीमत्दासबोध. व्यवस्थापन म्हणजे काय? हे दासबोधाच्या Samarth Ramdas Swami गुरुलक्षण, शिष्यलक्षण, विरक्तलक्षण, मूर्खलक्षण, पढतमूर्खलक्षण, चातुर्यलक्षण, बद्ध-मुमुक्षु-साधक-सिद्ध लक्षण, महंतलक्षण, राजकारण, उत्तमपुरुष, जनस्वभाव, प्रयत्नवाद, लेखनकला या लक्षणांवरून दिसून येते.
 

व्यवस्थापनाच्या दृष्टीने समर्थ Samarth Ramdas Swami हे प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते आहेत आणि दैववादाचे खंडनकर्ते आहेत. 'यत्न तो देव जाणावा' असे म्हणून प्रयत्न आणि परमेश्वर हे एकच आहेत याची जाणीव समर्थांनी पहिल्यांदा भारतीय समाजाला करून दिली. समर्थ हे अतिशय व्यवहारवादी संत होते. भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक म्हणूनही आपण त्यांच्याकडे बघू शकतो. त्यांनी निर्माण केलेले देशातील मठ हे सर्वोत्तम समर्थ नेतृत्वाचे Samarth Ramdas Swami उदाहरण होय! 'मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा' यानुसार माणसे जोडावीत आणि कार्य पूर्णत्वास जावे म्हणजेच समर्थ नेतृत्व होय. दासबोधातील ११ वा दशक हा संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजेच दासबोध. राजनीतीतील नेतृत्व कसे असावे याचा आत्मा म्हणजे समर्थांचा Samarth Ramdas Swami दासबोध. जे राजकारणात, समाजकारणात सामर्थ्यशाली नेतृत्व करतात त्यांच्या आचरणात समर्थांच्या चतु:सूत्रीतील राजकारण, हरिकथा निरूपण, स्वकर्म, उद्योगशीलता आणि सावधपण यांचा सातत्याने प्रत्यय येतो. मनुष्याच्या अंगी असलेल्या उत्तम गुणांमुळे त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते, याचा प्रत्यय दासबोध ग्रंथ सातत्याने अभ्यासल्याने येतो.

 

उत्तमपुरुष लक्षण समासात समर्थ सांगतात...

जो उत्तम गुणें शोभला। तोचि पुरुष माहा भला। कित्येक लोक तयाला। शोधीत फिरती।।

क्रियेविण शब्दज्ञान। तेंचि स्वानाचें वमन। भले तेथें अवलोकन। कदापि न करिती।।

उत्तम गुण बाणल्यामुळे जो व्यक्ती महंत असतो त्यालाच समाज सर्वश्रेष्ठ मानतो. त्याचा शब्द प्रमाण मानला जातो. लोक अक्षरश: त्याला शोधत फिरतात. 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले!' यानुसार वागणा-याच्या दर्शनानेही लोक कृतार्थ होतात. याउलट फक्त बडबड, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र काहीच नाही. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' याची जाणसुद्धा नसलेल्याकडे जाणती माणसे लक्षसुद्धा देत नाहीत. Samarth Ramdas Swami या बाबतीत शिवचरित्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल बुंदेला भेट हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी उत्तम नेतृत्वामुळे मावळ्यांचे संघटन केले आणि परकीय शत्रूंना उद्ध्वस्त केले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याने प्रभावित होऊन बुंदेलखंडाचा युवराज त्यांना भेटण्याकरिता महाराष्ट्रात आला. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच छत्रसाल बुंदेल्याने बुंदेलखंड स्वतंत्र केला.

 

चातुर्यलक्षण समासात समर्थ म्हणतात की,

 

म्हणौन दुस-यास सुखी करावे। तेणे आपण सुखी व्हावें। दुस-यास कष्टवितां कष्टावें। लागेल स्वयें।।

हे तों प्रगटचि आहे। पाहिल्याविण कामा नये। समजणें हा उपाये। प्राणिमात्रासी।।

 

सामर्थ्यशाली नेतृत्वात Samarth Ramdas Swami या ओवींचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घडतं. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्याने सर्व स्तरातील लोकांची, सर्व प्रकारची अडलेली-नडलेली कामे करावीत. सदैव त्यांच्या उपयोगी पडावे. त्यांना दु:खी-कष्टी करू नये. तर आणि तरच ते लोक मदतीस धावून येतील आणि वाटेल ते करायला तयार होतील. याबाबतीत रामायणातील एक प्रसंग बोलका आहे. त्यात प्रभू श्रीराम वनवासात जायला निघाले. तेव्हा अयोध्येचे नागरिक अत्यंत दु:खी झाले. श्रीरामाचे धाकटे बंधू भरत त्यांना परत अयोध्येकडे आणण्याकरिता निघाले. त्यावेळी हजारो अयोध्यावासी श्रीरामाचे मन वळवण्याकरिता भरतासह निघाले. राजा भरताने आपल्या नागरिकांना वनातून चालताना त्रास होऊ नये म्हणून जंगलातील रस्ते रुंद केलेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. वयोवृद्ध लोकांना नद्या-नाले, ओढे ओलांडता यावे म्हणून लाकडी पूल बांधले. वाटेत कुणी आजारी पडल्यास वैद्यकीय पथक आपल्यासोबत नेले. हे एक सर्वोत्तम समर्थ नेतृत्वाचे उदाहरण आहे. Samarth Ramdas Swami आंग्ल भाषेत एक म्हण आहे की, 'यथा राजा तथा प्रजा' यानुसार रामराज्यातील राजा अतिशय दक्ष आणि प्रजेचे हित जपणारा होता. म्हणूनच त्याची प्रजासुद्धा त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी होती.

 

Samarth Ramdas Swami उत्तम नेतृत्व हे आपल्याला आपल्या घरातून पाहावयास मिळते. नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण असे म्हणू शकतो की, आपल्या घरातील सगळ्या जबाबदा-यांची जाण असणारी व्यक्ती आणि त्या जबाबदा-या समर्थपणे सांभाळून कुटुंबाला पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे आपल्या घरातील स्त्री वर्ग होय! उदा. : आई, बहीण, मुलगी किंवा पत्नी यांच्याकडून नेतृत्वगुण आपल्याला नकळतपणे शिकता येतो. आजकालच्या काळात 'नेतृत्व' हा शब्द सर्वत्र व्यापक प्रमाणात वापरला आणि चर्चिला जातो. मुळात नेतृत्व म्हणजे काय? हा सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो.

 
तसाच प्रश्न दासबोधात ग्रंथारंभात सुरुवातीला विचारला जातो.

!!श्रीराम!! श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिले जी येथ।

श्रवण केलियानें प्राप्त। काय आहे।।

 

त्यावर समर्थांचे उत्तर असे आहे की, ग्रंथाचे नाव दासबोध. गुरू आणि शिष्य यांच्या प्रश्नोत्तरातून या ग्रंथाचे लिखाण केले गेले असून भक्तिमार्गाचे स्पष्ट विवेचन यात आहे. नेतृत्वाची व्याख्या काय? त्याचे प्रकार किती? या सर्व प्रश्नांची उत्तरे समर्थपणे दासबोधात मिळतात. समर्थांनी भक्तिमार्गाकरिता दासबोधाची रचना केली आहे. पण हा भक्तिमार्ग म्हणजेच ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रात सर्वोत्तम नेतृत्व करायचे आहे त्यांच्याकरिता असलेला राजमार्ग होय.Samarth Ramdas Swami

 

Samarth Ramdas Swami भक्तीद्वारे परमेश्वराची प्राप्ती होते. पण, त्यात योग्य आणि उचित नेतृत्व लाभले असेल तर आणि तरच परमेश्वर भेटतो. व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास कुठल्याही क्षेत्रात सातत्य, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि ध्येयासक्ती असेल तरच त्या कार्यक्षेत्रात यश मिळते आणि त्याच क्षेत्रातील नेतृत्व हे यशाचे शिखर गाठते. समर्थांनी सांगितलेली भक्ती आणि निष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजकाल व्यवस्थापन गुरू, तज्ज्ञ, सल्लागार अशा अनेक शब्दांचा भडीमार आपल्यावर सतत होत असतो. परंतु, पाश्चिमात्य व्यवस्थापन तज्ज्ञाकडून आपण जेवढे शिकतो किंवा त्यांचे अनुसरण करतो, तेवढे आपण भारतीय तत्त्ववेत्यांकडून किंवा व्यवस्थापन तज्ज्ञांकडून काही शिकतो का? किंवा त्यांचे अनुसरण करतो का? हे प्रश्न आपल्याला जाणवायला हवेत. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला दासबोधात Samarth Ramdas Swami मिळतात.

 

पुढे ग्रंथारंभात समर्थ म्हणतात की,

 

नवविधा भक्ती आणि ज्ञान। बोलिलें वैराग्याचे लक्षण। बहुधा अध्यात्मनिरोपण। निरोपिलें।।

म्हणजे समर्थ नवविधा भक्तीचे वर्णन करताना ब्रह्मज्ञान आणि वैराग्याचे लक्षणसुद्धा सांगतात. भक्तीच्या मार्गाने जाणा-यास जसे ईश्वराचे दर्शन घडते तसेच नियोजन आणि योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास उत्तम नेतृत्व करता येते आणि त्याचा दीर्घ काळ टिकणारा परिणाम उपभोगता येतो. Samarth Ramdas Swami दासबोधात खरा मी कोण? या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्कृष्ट भक्ती कोणती, सर्व देवांचा देव कोण, उत्तम भक्त कोण, जीव आणि शिव यांचे स्वरूप काय, अनेक मत आणि मतांतरे कोणती यांची उत्तरे मिळतात. उत्तम नेतृत्व म्हणजे काय? श्रमशक्ती, ज्ञानाची पातळी, कौशल्य, गुणवत्ता, प्रवृत्ती यांची गोळाबेरीज म्हणजे काय? याचे उत्तर म्हणजे समर्थ नेतृत्व होय!

 

ज्याप्रमाणे नेतृत्व म्हणजे नीती, मूल्य, मानसशास्त्र, अभिप्रेरणा (मोटिव्हेशन), कार्य पद्धती यांचे सार होय. त्याचप्रमाणे Samarth Ramdas Swami दासबोधात शिवगीता, रामगीता, गुरुगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत यांचा सुसंगम पाहावयास मिळतो. सामर्थ्यशाली नेतृत्व हे कशाप्रकारे बिघडू शकते ? याचे उत्तम उदाहरण दासबोधात समर्थांनी मांडले आहे. त्यात क्षुद्र टीकाकारांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. समर्थ म्हणतात की, संपूर्ण पुस्तक किंवा ग्रंथ नीट न वाचता जो त्यावर टीका करतो तो मूर्ख असतो. अशा प्रकारच्या मनोवृत्तीतूनच मत्सराची निर्मिती होते. त्यातून दुराभिमान आणि हीन वृत्ती प्रकट होते. पुढे यातूनच मिथ्या अभिमान आणि मग तीव्र क्रोध अंगीकारला जातो. मन अशा प्रकारे विकृत झाल्याने अंतर्यामी क्रोध आणि काम हे षडरिपू मनुष्याचे नुकसान करतात. याचेच नेमके प्रत्यंतर आपल्याला समाजात ठिकठिकाणी दिसून येते. मत्सर, दुराभिमान, दुष्टबुद्धी, तिरस्कार, कामक्रोध आणि अहंकार या अवगुणांमुळे एखादा भरभराटीस आलेला समूह किंवा Samarth Ramdas Swami संघटना काही कालावधीतच नामशेष होतात. आपल्या देशातील आणि परदेशातील अनेक संघटना अशाच प्रकारे धुळीस मिळालेल्या आपण पाहतो, वाचतो किंवा अनुभवतोसुद्धा! याचे मुख्य कारण म्हणजे संबंधित नेतृत्वात असलेली अव्यवस्था आणि दुराभिमान होय.

 

उत्तम नेतृत्वSamarth Ramdas Swami करायचे असल्यास दासबोधातून आपणास जेवढे सोसेल तेवढेच घ्यावे, पण अहंकार बाजूस सारून घ्यावे. त्यामुळे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने सारे संशय समूळ नष्ट होतात. स्वातंत्र्यानंतर अनेक उद्योग समूह आपल्या देशात निर्माण झाले. पण यापैकी जमशेदजी टाटांनी सुरू केलेला उद्योग समूह आपल्याला का जवळचा वाटतो? कारण, टाटा उद्योग समूहात कर्मचा-यांना आपल्या घरातील कुटुंबाप्रमाणे, सदस्यांप्रमाणे वागवले जाते. जेआरडी टाटा, रतन टाटांसारखे समर्थ नेतृत्व या उद्योग समूहास लाभले. त्यामुळे टाटा उद्योग समूह आज झेपावत आहे आणि त्यामुळे राष्ट्राची प्रगती होत आहे. इतर उद्योग समूहांनी पण या प्रकारेच स्वत:चे धोरण राबवून स्वत:सहित राष्ट्राचा विकास करावा.

 
- माधव किल्लेदार 
 

९९२१६८४२२४

Powered By Sangraha 9.0