योगेश आणि रुपाली सुतार दाम्पत्याच्या चित्रप्रदर्शनाला रसिकांची दाद
27 Apr 2022 13:41:59
पीएनजीच्या कलादालनात ३१ चित्रांची मेजवानी
जळगाव : खान्देशातील प्रख्यात चित्रकार योगेश सुतार आणि चित्रकर्ती रुपाली सुतार या दाम्पत्याच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच शहरातील पु.ना गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात प्रमुख पाहुणे कौटुंबिक न्यायालयातील मॅरेज कौन्सिलर स्मिता जोशी, प्रसिद्ध शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी, प्रसिद्ध रंगकर्मी शरद पांडे आणि पु.ना.गाडगीळ आणि सन्सचे मॅनेजर संदीप पोतदार यांच्या हस्ते झाले. 2 मे पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत रसिक या चित्रप्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतील.यात 31 विविधांगी चित्रे रसिक पाहू शकतील.