'इंडियन आयडल 12'ची सेकंड रनर अप सायली कांबळे आज रविवारी लग्नबंधनात अडकली असून प्रियकर धवलसोबत आज तिचा लग्न सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला असून सायली व धवलच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत सायली पिवळ्या रंगाच्या नऊवारीत अतिशय सुंदर दिसतेय. सायलीने लग्नासाठी पिवळ्या रंगाची पारंपरिक महाराष्ट्रीयन काठपदराची साडी निवडली दिसतेय. तर धवलने पेशवाई कुर्ता परिधान केला होता.