अंधाराचा फायदा घेत देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा; प्रवाशांना लुटले

22 Apr 2022 11:25:48
औरंगाबाद : औरंगाबाद पोटूळ येथील रेल्वेस्थानकाजवळ दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकला. 8 ते 9 जणांच्या टोळीने रेल्वेवर तुफान दगडफेक करत प्रवाशांचे मोबाइल, पर्स, काही महिलांचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना घडली. . देवगिरी एक्स्प्रेसवर दगडफेक करुन दरोडा टाकला. दौलताबाद - पोटूळ स्थानकादरम्यानची ही घटना घडली. 
 
दरम्यान, प्रवाशांच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, 2 लाख किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Robbery by throwing stones on Devagiri Express) सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दौलताबाद - पोटूळ स्थानकादरम्यान अज्ञात चोरट्यांनी रेल्वेवर दगडफेक करत रेल्वे रोखण्याचा हा प्रकार घडला. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी दगडफेक करायला सुरुवात केली. मात्र, प्रवाश्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
 
 

patul
 
 
 
 
दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याचा संशय आहे. सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर पोटूळ स्थानकाजवळ पोहोचताच चालकाला तेथील सिग्नल बंद दिसले. सिग्नलवर दरोडेखोरांनी कापड बांधले होते. लोको पायलटने स्टेशन मास्तरला याबाबत कळवले. तोपर्यंत रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक सुरु झाली. डब्यांमध्ये 8 ते 9 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपेतील महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाइल, पर्सही हिसकावल्या. प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली.
 
मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही घटना कळली नाही. 7 ते 8 डब्यांमध्ये त्यांनी लूटमारीचा प्रयत्न केला आणि नंतर पळ काढला. अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. तिथे पोलिस चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरवर आला आहे. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0