शासकीय औद्योगिक संस्थेत गुरुवारी रोजगार मेळावा

18 Apr 2022 20:50:54
धुळे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार, प्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन गुरुवार २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त शं. बा. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
 
 
ime
 
 
या मेळाव्यात पाचवी, दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रेंटिस भरतीची संधी उपलब्ध होणार आहे. स्वयंरोजगार मार्गदर्शन, शासनाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील आर्थिक विकास महामंडळांचे परतिनिधी उपस्थित राहतील.
 
तसेच शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी, मार्गदर्शनासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0