काय? खुर्चीत बराच वेळ बसून ऑफिसचं काम करावे लागते , पाठदुखीने त्रस्त आहात ?आराम मिळण्याकरिता 'हे' करा उपाय

10 Mar 2022 11:06:08
back pain? सतत 8 ते 9 तास काम केल्याने हल्ली अनेकांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. पाठदुखीची ही समस्या बराच काळ राहिल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते याकरिता वेळीच डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार, व्यायाम, दिनचर्या याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
 

pain 
ऑफिसमध्ये तासन्‌तास काम करणे आणि एकाच स्थितीत बराच वेळ बसून राहिल्याने पाठ दुखते. काही वेळा पाठदुखीच्या वेदना इतक्या असह्य होतात की, बसणेही कठीण होऊन जाते. काही वेळा ओणवे वाकले तरीही त्रास होतो, खाली वाकताच येत नाही.
 
पाठदुखी होण्यामागी कारणे
 
-सातत्याने मान खाली घालून काम केल्यानेसुद्धा पाठीचे स्नायू ताणले जातात त्यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
-खेळताना किंवा प्रवास करताना वारंवार धक्के बसल्याने अनेक वेळा पाठीच्या कण्याला त्रास होतो, यामुळे पाठीचे दुखणे           उद्भवू   शकते.
 
- तसेच मानसिक ताणाचे अति जास्त प्रमाण, थकवा यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येतो.
- बऱ्याचदा लोकं रात्री झोपताना पाय दुमडून झोपतात. काही लोकांचा अशा पद्धतीने झोपले की, आराम मिळतो असे त्यांना         वाटते, मात्र अशा प्रकारे    झोपल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
    त्यामुळे शक्यतो रात्री सरळ झोपण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर गरोदरपणातसुद्धा पाठ दुखते, गरोदरपणामध्ये आपल्या       शरीरात विविध बदल होतात.
     अशा वेळीही पाठ दुखते. या काळात जास्त वेळ बसले किंवा चालले तरीही पाठीवर ताण येतो.
 
पाठदुखीवर उपाय
 
- चालताना किंवा कुठेही बसताना, पाठ सरळ आहे का याकडे लक्ष द्या.
- विशेषतः जी लोकं ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात त्यांनी सरळ स्थितीत बसावे, कारण ऑफिसमध्ये अधिक वेळ काम करत राहिल्याने पाठीचे दुखणे उद्भवण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशावेळी काम करताना कटाक्षाने ताठ आणि सरळ बसण्याचा प्रयत्न करावा.
 
- स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करत असाल, तर असा कोणताही व्यायाम करू नका ज्यामध्ये तुम्हाला पुढे झुकावे लागेल. जर तीव्र पाठदुखी असेल तर काही दिवस व्यायामातून ब्रेक घ्या.
 
- ऑफिसमध्ये किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या केबिनमधून ऑफिसमध्ये फेरी मारत रहा. यामुळे पाठदुखीपासून आराम मिळेल.
 
- कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल. असे केल्याने पाठदुखीचा त्रास उद्भवणार नाही.
 
- व्हिटॅमिन डी3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. माशांमधील पोषक तत्त्वे हाडांसाठी खूप फायदेशीर असतात.
Powered By Sangraha 9.0