संघाच्या कामगिरीबाबत केलं मोठं विधान : रोहित शर्मा

07 Feb 2022 10:47:26
अहमदाबाद - भारतीय संघाने रविवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करत २०२२ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.
 
rohit
 
 
मात्र भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा हा या विजयावर समाधानी नाही आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंग ऑर्डरवरही दबाव आणू शकलो असतो.
 
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, मी परफेक्ट गेमवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही नेहमी परफेक्ट असू शकत नाही. आम्ही नेहमी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. या सामन्यात सर्वांनीच चांगली कामगिरी केली आहे. आम्ही सर्व बॉक्सवर टीक केलं आहे. आम्ही फलंदाजी करताना चांगल्या पद्धतीने फिनिश करू शकलो असतो. त्यासाठी एवढ्या विकेट्स गमावण्याची गरज नव्हती.
 
रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही गोलंदाजी करतानाही त्यांच्यावर दबाव आणू शकलो असतो. ज्यामुळे त्यांच्या तळाच्या फलंदाजांना अधिक दावा बनवता आल्या नसत्या. आमचा प्रयत्न एक संघ म्हणून चांगले होण्याचा आहे. जर आम्हाला काही वेगळे करावे लागत असेल तर तेसुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला फार काही बदलावे लागेल, असे मला वाटत नाही. मी सहकारी खेळाडूंना सांगू इच्छितो की, तुम्ही स्वत:शीच स्पर्धा करा.
 
स्वत:च्या फलंदाजीबाबत रोहित शर्माने सांगितले की, मी दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर मी पुनरागमन करत होतो. नेट्समध्येही मी सातत्याने सराव केला. मला माहिती होते की, पुढे खूप मोठा हंगाम बाकी आहे. अशा परिस्थितीत मला पूर्ण विश्वास होता. या सामन्यामध्ये नाणेफेक महत्त्वाची होती. मात्र नाणेफेकीवर फार अवलंबून राहायचे नाही, असा आमचा प्रयत्न होता.
 
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखालील हा पहिला सामना होता. त्या भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा जमवल्या होत्या. या आव्हानाचा भारतीय संघाने सहा विकेट राखून विजय मिळवला.
Powered By Sangraha 9.0