काय ? गांगुलीचीही खुर्चीही जाणार

24 Feb 2022 10:40:27
नवी दिल्ली : सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ समाप्त होत आला आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळू शकतात. बीसीसीआयमध्ये (BCCI) लवकरच मोठे बदल होणार आहे. बीसीसीआयची 2 मार्चला एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचं भवितव्य ठरणार आहे.
 


Ganguly 
 
कोरोनामुळे बीसीसीआयची गेल्या वर्षी बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे आता 2 मार्चला बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकी गांगुलीच्या अध्यक्षपदाचं भवितव्य आणि आगामी टी 20 वर्ल्ड कपबाबत चर्चा होऊ शकते. बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष कोण होणार हे या बैठकीत ठरणार आहे.
 
बीसीसीआय अध्यक्षपदासाठी विद्यमान सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. राजीव शुक्ला (Rajeev Shukla) हे आयपीएलचे चेयरमन राहिले आहेत. त्यामुळे या दौघांपैकी कोणा एकाची वर्णी लागणार की बीसीसीआय पुन्हा गांगुलीला कार्यकाळ वाढवून देणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
 
गांगुली हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. गांगुलीने टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवलं. निवृत्तीनंतर गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाला. त्यानंतर गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी वर्णी लागली. गांगुलीची अध्यक्षपदाची कारकिर्द ही वादग्रस्त राहिली. गांगुली अध्यक्षपदावर असताना अनेक बदल पाहायला मिळाले. गांगुलीच्या कॅप्टन्सीत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडला ती जबाबदारी देण्यात आली. व्ही व्ही एस लक्ष्मणला एनसीएच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवल्याच्या मुद्द्यावरुन गांगुलीचा त्याच्याशी वाद झाला होता. त्यामुळे आता 2 तारखेच्या बैठकीत अनेक बदलाव पाहायला मिळू शकतात.
Powered By Sangraha 9.0