नंदुरबार : मोफत शिबिराच्या नावाखाली बोगस रुग्णांची नोंद घेवुन डेटा चोरणार्या डएतAचजइ डढङ या संस्थेवर कारवाई करण्यात यावी. तसेच रुग्णांची खोटी माहिती गोळा करणार्या संस्थेची चौकशी करुन सरकारी रुग्णालयातील डेटा चोरणार्या संस्थेवर व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यात डएतAचजइ डढङ उत्तर प्रदेशातील संस्थेने गेल्या दहा महिन्यांपासुन मोफत शिबीर सुरु केले आहे. या शिबिरात जिल्हा परिषदेचे काही डॉक्टर देखील भरगच्च मानधन घेवुन सेवा देत आहेे. हे डॉक्टर सरकारी रुग्णालयात नोंदी असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती चोरुन ती संस्थेला पाठवित आहेत. ती संस्था रुग्णांचा हा डेटा विदेशात पाठविण्याचे कार्य करुन सीआरसी फंड मोठ्या प्रमाणात मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या सुरु असलेल्या शिबिरांच्या पथकावर दरमहा सुमारे सात लाख रुपये खर्च केला जात आहे. शिबिराच्या नावाखाली ग्रामीण भागातील लोकांचे आधारकार्ड नंबर व वैैयक्तिक माहिती गोळा करुन त्याचा डेटा विदेशात पाठविला जात असल्याने त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्थेने कोविड कालावधीची संधी साधत ग्रामीण जनतेप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने स्थानिक डॉक्टर व कर्मचारी नेमले असून त्यांना मोठ्या प्रमाणावर मानधन दिले जात आहे. या कर्मचार्यांना दररोज दिडशे ते दोनशे रुग्णांची माहिती (डेटा) गोळा करुन ती पाठविण्याचे टारगेट देण्यात आले आहे. त्यामुळे मोफत शिबीर हे नावापुरतेच होत असून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करणे हा एकमेव उद्देश या संस्थेचा आहे. या शिबिरासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अनधिकृतपणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही गंभीर बाब असून आरोग्य उपकेंद्रातील रुग्णांची माहिती तसेच ग्रामपंचायत मधील दप्तरातील ग्रामस्थांची यादी बनवुन रोज दिडशे ते दोनशे रुग्ण तपासणी केल्याची खोटी माहिती संस्था जमा करत आहे. ही बाब गंभीर असून याची चौकशी व्हावी व सरकारी रुग्णालयातील डेटा चोरणार्या संस्थेवर व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क अध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा सचिव पवनकुुमार गवळे, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, प्रसिध्दीप्रमुख कमलेश माळी, खोंडामळी गटाध्यक्ष अशोक माळी, शनिमांडळ गटाध्यक्ष रायसिंग भिल आदींनी निवेदनातून केली आहे.