काय ? अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड बनवायचे आहे ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

14 Feb 2022 14:56:39
PAN Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही आज अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ओळख पटवण्यासाठी आधार कार्डला अधिकृत मान्यता आहे तर आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. हेच पॅन कार्ड अल्पवयीन मुलांचेही बनवले जाऊ शकते. अनेक वेळा परदेशात जाण्यासाठी किंवा शाळेत गरजेच्या वेळी पॅन कार्डची आवश्यकता असते. परंतु, महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही अल्पवयीन मुलाला पॅन कार्डसाठी थेट अर्ज करता येत नाही तर त्याच्या पालकांनीच यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी संबंधित मुलाच्या आई-वडिलांच्या काही कागदपत्रांची आवश्यकता असते.
 

pan card 
 
 
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
 
अल्पवयीन मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित मुलाच्या आई आणि वडिलांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराचा पत्ता आणि त्याच्या ओळखीचा पुरावा गरजेचा आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओखळपत्र, यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. रहिवाशी प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड, घर नोंदणी दस्तऐवज, मूळ रहिवासी प्रमाणपत्राची प्रत किंवा पोस्ट ऑफिस पासबुकपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे असल्यानंतर पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
 
असा करा पॅन कार्डसाठी अर्ज!
 
- प्रथम NSDL च्या साईटवर जा.
- त्यानंतर ज्या अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढायचे आहे त्याचा सेक्शन निवडा.
- सेक्शन निवडण्यासाठी मुलाची सर्व माहिती भरा.
- त्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वयाचा दाखला आणि पालकांच्या फोटोसह इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- आई आणि वडिलांची डिजिटल स्वाक्षरीही अपलोड करावी लागेल.
- महत्वाची बाब म्हणजे पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला 107 रूपये फी भरावी लागेल. ही फी डिजिटल स्वरूपात भरता          येईल.
- फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर मेलवर कंफर्मेशन येईल.
- अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रिसीट नंबर मिळेल, तो सांभाळून ठेवायचा आहे. कारण या नंबरवरूनच अर्जाचा स्टेटस पाहता येणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाचे पॅन कार्ड पोहोच होईल.
Powered By Sangraha 9.0