सयाजी शिंदेंच्या 'देवराई'ला भीषण आग

13 Feb 2022 19:53:53
औरंगाबाद : बीड येथे उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराईला रविवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागली. अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ही देवराई उभारण्यात आली होती. या आगीमुळे तब्बल दोन एकरवर असलेल्या झाडांचे नकसान झाले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
Devrai
 
पालवन गावाजवळ असलेल्या परिसरात एकूण २५ एकरमध्ये सह्याद्री देवराईचा परिसर आहे. यात सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र लागलेल्या आगीत वड, पिंपळ आणि लिंबाचं झाड यासोबतच तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे. सयाजी शिंदेंनी वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले असून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत. जगातले पहिले वृक्षसम्मेलनही याठिकाणी घेण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0